Amol Palekar : प्रकृती खालावल्यानं जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर रुग्णालयात दाखल

Actor & Director Amol Palekar Health : फक्त विनोदी भूमिकाच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ताकदीनं साकारणारा अभिनेता म्हणून अमोल पालेकर यांच्या पाहिलं जातं.

Amol Palekar : प्रकृती खालावल्यानं जेष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर रुग्णालयात दाखल
अमोल पालेकर, ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक
Follow us
| Updated on: Feb 10, 2022 | 6:51 AM

पुणे : ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांची प्रकृती (Actor & Director Amol Palekar Health) खालावली असून त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinananath Mangeshkar Hospital, Pune) दाखल करण्यात आलंय. अमोल पालेकर यांना झालेल्या एका दीर्घ आजारवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांची पत्नी संध्या गोखले यांनी दिली आहे. 10 वर्षांपूर्वीही त्यांना याच आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर उपचार सुरु होत असून आता काळजी करण्यासारखं कोणतंही कारण नसल्याचं अमोल पालेकर यांची पत्नी संध्या गोखले (Sandhya Gokhale) यांनी म्हटलंय. अमोल पालेकर यांना अतिधुम्रपान केल्यामुळे त्रास झाला होता. त्यामुळे 10 वर्षांपूर्वी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मराठीतच नव्हे तर हिंदीतही काम!

अमोल पालेकर यांनी 70 आणि 80 च्या दशकात एक काळ गाजवलेला होता. मराठीसोबतच अमोल पालेकर यांनी हिंदी सिनेसृष्टीतही केलेलं कामाची आजही अनेकजण आठवण काढतात. फक्त विनोदी भूमिकाच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ताकदीनं साकारणारा अभिनेता म्हणून अमोल पालेकर यांच्या पाहिलं जातं. एक उमदे चित्रकार असणाऱ्या अमोल पालेकर यांनी सिनेसृष्टीतत येण्याआदी एका बँकेत नोकरी केली होती. बँक ऑफ इंडियात अमोल पालेकर क्लार्क म्हणून काम करायचे.

गोलमालपासून पहेलीपर्यंत!

मराठीतील शांतता कोर्ट चालू आहे, या सिनेमांच्या माध्यमातून अमोल पालेकरांनी सिनेमाक्षेत्रात पर्दापण केलं. बाजीरावचा बेटा हा सिनेमाही अमोल पालेकरांच्या सुरुवातीच्या काळातील उल्लेखनीय सिनेमांपैकीच एक होता. दरम्यान, गोलमाल सिनेमातील त्यांचा डबलरोल आजही लोकं विसरलेली नाहीत. चितचोर, रंगी-बेरंगी, बातों बातों मे हे सिनेमा रसिकांना प्रचंड भावले होते. आपल्या सिनेमाची एक वेगळी ओळख त्यांनी हिंदी सिनेक्षेत्रात तयार केली होती. यानंतर त्यांनी शाहरुख खान आणि राणी मुखर्जीच्या पहेली सिनेमाचं दिग्दर्शनही केलं होतं.

संबंधित बातम्या :

चित्रपट विश्वात येण्यापूर्वी बँकेत नोकरी करायचे अमोल पालेकर, मनोरंजन विश्वात येण्यामागे ‘खास’ कारण…

‘पालेकरांसोबत काम करणं अद्भुत अनुभव’ अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या भावना

अमोल पालेकर आणि रिंकू राजगुरूचा “200 – हल्ला हो” हिंदी आणि मराठीतही; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.