AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Amol Palekar | चित्रपट विश्वात येण्यापूर्वी बँकेत नोकरी करायचे अमोल पालेकर, मनोरंजन विश्वात येण्यामागे ‘खास’ कारण…

अभिनेता आणि दिग्दर्शक अमोल पालेकर (Amol Palekar) यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1944 रोजी झाला. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त अमोल पालेकर यांनी मराठी चित्रपटातही भरपूर काम केले. हिंदी सिनेप्रेमींसाठी ‘गोलमाल’ चित्रपटातील रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा हे नाव ऐकताच त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो.

Happy Birthday Amol Palekar | चित्रपट विश्वात येण्यापूर्वी बँकेत नोकरी करायचे अमोल पालेकर, मनोरंजन विश्वात येण्यामागे ‘खास’ कारण...
Amol Palekar
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 24, 2021 | 8:00 AM
Share

मुंबई : अभिनेता आणि दिग्दर्शक अमोल पालेकर (Amol Palekar) यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1944 रोजी झाला. हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त अमोल पालेकर यांनी मराठी चित्रपटातही भरपूर काम केले. हिंदी सिनेप्रेमींसाठी ‘गोलमाल’ चित्रपटातील रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा हे नाव ऐकताच त्यांचा चेहरा डोळ्यांसमोर येतो. चित्रपटात रामप्रसाद आपली नोकरी वाचवण्यासाठी दुहेरी भूमिकेचा अवलंब करून मुलीच्या वडिलांना मूर्ख बनवतो. यातील त्यांचा परफॉर्मन्स पाहून प्रेक्षकांना जोरदार हशा पिकला होता.

आपल्या गंभीर अभिनयासोबतच अमोल पालेकर यांनी आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना खळखळून हसवण्यातही यश मिळवले आहे. अमोल पालेकर अभिनय आणि दिग्दर्शन क्षेत्रात येण्यापूर्वी बँकेत नोकरी करायचे, असे हे फार कमी लोकांना माहीत असेल. ते बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक होते. याशिवाय अमोल पालेकर हे सामाजिक कार्यातही सक्रिय असतात.

मनोरंजन विश्वात येण्यामागे ‘खास’ कारण

अमोल पालेकर यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यामागे एक खास व्यक्ती होती. ती दुसरी कोणी नसून त्याची मैत्रीण चित्रा होती. चित्रा थिएटरमध्ये आर्टिस्ट होत्या. त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवण्यासाठी ते थिएटरमध्ये आले. मग, अशी वेळ देखील आली जेव्हा दोघांनाही वाटले की, आपण आपले नाते आता पुढे नेले पाहिजे.

अमोल पालेकर आणि चित्रा यांच्यात निर्माण झालेल्या प्रेमामागे दोघांची आवड ही एकच होती. अमोल हे खूप चांगले चित्रकारही आहेत. चित्रा यांना देखील कलेची आवड होती. दोघांनीही एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळेच अमोल पालकर पुन्हा चित्रा यांच्यासोबत थिएटर रिहर्सलला जाऊ लागले. येथेच एके दिवशी अमोल पालेकर यांची सत्यदेव दुबे यांच्याशी भेट झाली, ज्यांनी त्यांना अभिनय क्षेत्रात येण्याची प्रेरणा दिली.

‘रजनीगंधा’ हिट झाला अन् प्रवास सुरु झाला…

दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांना अमोल पालेकर यांना एका चित्रपटासाठी कास्ट करायचे होते, ज्यात जया बच्चन त्यांच्यासोबत असणार होत्या. पण, अमोल यांनी नकार दिला. यानंतर बासू चॅटर्जी पुन्हा एकदा त्यांच्या पुढच्या चित्रपटासाठी त्यांच्याशी संपर्क साधला. अखेर बरीच समजूत काढल्यानंतर अमोल पालेकर यांनी चित्रपट साईन केला. हा चित्रपट सुपरहिट झाला आणि अमोल पालेकर यांच्या करिअरला सुरुवात झाली.

1974 मध्ये बासू चॅटर्जी यांच्या ‘रजनीगंधा’ या चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट हिट झाला आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एक अभिनेता म्हणून त्यांनी ‘चितचोर’, ‘घरौंदा’, ‘मेरी बीवी की शादी’, ‘बातों-बातों में’, ‘गोलमाल’, ‘नरम-गरम’, ‘श्रीमान-श्रीमती’ असे अनेक अविस्मरणीय चित्रपट दिले आहेत. ते बहुतेक चित्रपटांमध्ये मध्यमवर्गीय समाजाच्या नायकाचे प्रतिनिधित्व करायचे.

हेही वाचा :

Rhea Chakraborty | अनुष्का रंजनच्या लग्नात रिया चक्रवर्तीचा ‘परम सुंदरी’ अंदाज, लेहेंग्याची किंमत ऐकून व्हाल हैराण!

International Emmy Awards 2021 : यंदा भारताच्या पदरी निराशा, सुष्मिताच्या ‘आर्या’ला नामांकन, मात्र पुरस्कार हुकला!

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...