AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

International Emmy Awards 2021 : यंदा भारताच्या पदरी निराशा, सुष्मिताच्या ‘आर्या’ला नामांकन, मात्र पुरस्कार हुकला!

न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या ‘आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2021’मधून भारताला खूप आशा होत्या. वास्तविक, यावेळी वीर दास, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सुष्मिता सेन अभिनित ‘आर्या’ला भारताकडून नामांकन मिळाले होते आणि सर्वांनाच विजयाची अपेक्षा होती. मात्र, यावेळी भारताला एकही विजय न मिळाल्याने चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

International Emmy Awards 2021 : यंदा भारताच्या पदरी निराशा, सुष्मिताच्या ‘आर्या’ला नामांकन, मात्र पुरस्कार हुकला!
Emmy Awards 2021
| Edited By: Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 23, 2021 | 2:46 PM
Share

मुंबई : न्यूयॉर्कमध्ये पार पडलेल्या ‘आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार 2021’मधून भारताला खूप आशा होत्या. वास्तविक, यावेळी वीर दास, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सुष्मिता सेन अभिनित ‘आर्या’ला भारताकडून नामांकन मिळाले होते आणि सर्वांनाच विजयाची अपेक्षा होती. मात्र, यावेळी भारताला एकही विजय न मिळाल्याने चाहत्यांच्या पदरी निराशा पडली आहे.

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी, वीर दास आणि सुष्मिता सेन यांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये नामांकन मिळाले होते. वास्तविक, यावेळी त्यांनी फ्रान्स आणि स्कॉटलंडसारख्या देशांना तगडी स्पर्धा केली आणि या ट्रॉफीसाठी चुरस रंगली.

कोणी मारली बाजी?

आंतरराष्‍ट्रीय एमी अवॉर्ड्समध्‍ये नवाजुद्दीन सिद्दीकीला ‘सिरीयस मॅन’मधील अभिनयासाठी सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते. मात्र, स्कॉटिश अभिनेता डेव्हिड टेनंट याने या श्रेणीत ट्रॉफी आपल्या नावावर केली. दुसरीकडे, वीर दासचा शो बेस्ट कॉमेडी कॅटेगरीत मागे पडला आहे. वीरला मात देत, हा पुरस्कार ‘कॉल माय एजंट’ या हिट फ्रेंच शोला मिळाला आहे.

‘आर्या’कडून होती अपेक्षा

सुष्मिता सेनच्या ‘आर्या’ला सर्वोत्कृष्ट नाटक विभागात नामांकन मिळाले होते. सुष्मिताच्या या मालिकेकडून चाहत्यांना खूप आशा होत्या. तथापि, ‘आर्य’ला  इस्रायली प्रोडक्शन तेहरानने पराभूत केले. नवाजुद्दीन दुसऱ्यांदा इंटरनॅशनल एमी अवॉर्ड्समध्ये सहभागी झाला होता. याआधी ‘सेक्रेड गेम्स’ आणि ‘मॅकमाफिया’चा दबदबा होता.

‘दिल्ली क्राईम’ला मिळाला होता पुरस्कार

गेल्या काही वर्षांत भारतीय शो आणि कलाकारांना आंतरराष्ट्रीय एमी अवॉर्ड्समध्ये ओळख मिळाली आहे. गेल्या वर्षी ‘दिल्ली क्राइम’ला सर्वोत्कृष्ट ड्रामाचा पुरस्कार मिळाला, ज्याने संपूर्ण भारताला अभिमान वाटला. ‘मेड इन हेवन’ या शोसाठी अभिनेता अर्जुन माथूरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मात्र, तो जिंकू शकला नाही.

एमी अवॉर्ड्समध्ये नॉमिनेट झाल्याबद्दल नवाजुद्दीनने एका मुलाखतीत सांगितले की, ‘सिरीयस मॅनसाठी नामांकन मिळाल्याने मी खूप आनंदी आहे, परंतु मी पुरस्कार जिंकण्यासाठी कोणत्याही उंदीरांच्या शर्यतीचा भाग नाही. लोकांनी मला खूप प्रेम दिले आणि मला या श्रेणीत नामांकन मिळाले ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे.’

बरं, नवाजुद्दीन, सुष्मिता आणि वीर दास यांना एकही विजय मिळाला नसला, तरी भारताला त्यांचा खूप अभिमान आहे.

हेही वाचा :

Samantha Ruth Prabhu | ‘ये लाल इश्क, ये मलाल इश्क…’, समंथाच्या साडी लूकवर चाहते झालेयत फिदा!

Hansika Motwani | ‘कोई मिल गया’ फेम हंसिका मोटवानीचं बिकिनी कलेक्शन, सोशल मीडियावर डिझाईन्सची चर्चा!

Priyanka Chorpa-Nick Jonas | केवळ नाव हटलं पण सारं काही आलबेल! निक जोनासच्या व्हिडीओवर प्रियांकाची ‘खास’ कमेंट!

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?