
कतरिना कैफ आणि विकी कौशल आज 9 डिसेंबर 2025 रोजी त्यांचा लग्नाचा चौथा वाढदिवस आहे. चाहते सकाळपासूनच त्यांच्या पोस्टची वाट पाहत होते. हा वाढदिवस त्यांच्यासाठी खास असणार आहे कारण हा लग्नाचा वाढदिवस ते त्यांच्या बाळासोबत सेलिब्रेट करणार आहेत. त्यामुळे विकी-कतरिना नक्की कशापद्धतीने हा दिवस साजरा करतात याकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलं होतं. पण आता विकीने एक पोस्ट केली आहे. ज्यात त्याने कतरिना आणि त्याचा फोटो पोस्ट केला आहे ज्यात बाळ झाल्यानंतर कतरिनाची सुरु असलेली कसरत त्याने व्यक्त केली आहे.
कतरिनासोबतचा एक रोमँटिक सेल्फी
विकीने अखेर त्याच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपवली, कतरिनासोबतचा एक रोमँटिक सेल्फी पोस्ट करत आणि तिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही खास पोस्ट शेअर केली. पालक झाल्यानंतर कतरिनासाठी ही विकीची पहिली पोस्ट आहे. मंगळवारी रात्री विकीने इंस्टाग्रामवर स्वतःचा आणि कतरिनाचा एक गोड, झोपाळू सेल्फी पोस्ट केला. दोघांच्याही चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता, पण त्यांचे हास्यही तितकेच आनंददायी होते.
विकीने कतरिनाला आपल्या मिठीत घेतले
विकीने कतरिनाला आपल्या मिठीत घेतले होते आणि तिच्याकडे तो प्रेमाने पाहत होता. या फोटोला त्याने कॅप्शन दिले आहे की “आजचा आनंद साजरा करत आहोत…तोही आनंदी, कृतज्ञ आणि अपुऱ्या झोपेसह, आम्हाला 4 वर्षांच्या आनंदाच्या शुभेच्छा.”
पोस्ट येताच, सेलिब्रिटी मित्र आणि चाहत्यांनी या जोडीवर प्रेमाचा वर्षाव केला. नेहा धुपिया, झोया अख्तर आणि इतर अनेक स्टार्सनी त्यांच्यावर हार्ट इमोजींचा वर्षाव केला. एका चाहत्याने लिहिले, “पालक पालकत्व करत असतात.” तर काहींनी “नजर ना लागे” आणि “आई आणि बाबा ग्लो करत आहेत” अशा अनेक कमेंट्स करत आहेत. तसेच आता चाहत्यांना उत्सुकता आहे ती या जोडीच्या बाळाला पाहण्याची.
कतरिना आणि विकीची प्रेमकहाणी
9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्सेस फोर्ट बरवाडा येथे एका अतिशय खाजगी आणि स्वप्नाळू समारंभात विकी आणि कतरिनाचे लग्न झाले. नोव्हेंबरमध्ये, या जोडप्याने त्यांच्या मुलाच्या जन्माची घोषणा करत लिहिले, “आमचे आनंदाचे छोटेसे गिफ्ट आले आहेत. 7 नोव्हेंबर 2025.” या पोस्टने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली, 40 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले. विकीचा भाऊ सनी कौशल यानेही आपला आनंद व्यक्त करत लिहिले, “मी काका झालो आहे.” पालक झाल्यानंतर या जोडप्याने एक नवीन कार देखील खरेदी केली होती.