Katrina Kaif-Vicky Kaushal : कतरिना कैफ-विकी कौशलच्या घरी आला चिमुकला पाहुणा, शेअर केली गुड न्यूज
Katrina Kaif And Vicky Kaushal : अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल आई बाबा बनले आहेत. त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यांना मुलगा झाला की मुलगी ?

Katrina-Vicky : बॉलीवुडमधील प्रसिद्ध जोडपं कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी गुड न्यूज दिली आहे. त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. त्यांचे चाहते या आनंदाच्या बातमीची खूप दिवसांपासुन वाट पहात होते. कतरिना आणि विकी आई-बाबा बनले आहेत. अभिनेत्रीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून ही गुड न्यूज शेअर करण्यात आली आहे. चाहते प्रचंड आनंदले असून त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
विकी आणि कतरिना यांनी त्यांच्या मुलाचे जगात स्वागत करताना एक संयुक्त पोस्ट शेअर केली. “आमच्या घरी आनंदाचं गाठोडं आलं आहे. खूप आनंद आणि उत्साहाने आम्ही आमच्या मुलाचं स्वागत करतो – कतरिना आणि विकी.. ” असं लिहीलेली पोस्ट त्यांनी शेअर केली. Blessed अशी कॅप्शनही याोबत लिहीली आहे.
View this post on Instagram
कतरिनाने मुलाला दिला जन्म
विकी आणि कतरिनाच्या पोस्टनुसार, अभिनेत्री आज, 7 नोव्हेंबर रोजी आई झाली. आज त्यांच्या मुलाचा जन्म झाला. या जोडप्याने ही गुड न्यूज त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांच्या पोस्टवर लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव झाला. साधारण दीड महिन्यापूर्वी विकी-कतरिनाने एक खास फोटो पोस्ट करत प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. आमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर चॅप्टर आता सुरू होत आहे असं म्हणत, त्यांनी ही अनाऊन्समेंट केली होती.
गेल्या अनेक महिन्यांपासून कतरिना सार्वजनिक ठिकाणी न दिसल्यामुळे तिच्या प्रेग्नन्सीबद्दल विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर विकी-कतरिनाने अधिकृत घोषणा केली. तर आज त्यांच्या लाडक्या मुलाचा जन्म झाला असून ते आई-बाबा बनले आहेत.
सेलिब्रिटी , चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षा
विकी-कतरिनाच्या अकाऊंटवर ही न्यूज येताच लाखो चाहत्यांनी तसेच अनेक सेलिब्रिटींनी ही पोस्ट लाईक केली. तसेच त्यावर कमेंट्स कत दोघांचे अभिनंदनही केलं. अभिनेता राजकुमार राव, गायिका शिल्पा राव, श्रेया घोषाल, रेणुका शहाणे, अमृता खानविलकर यांच्यासह अनेकांनी त्या दोघांचे अभिनंदन करत नव्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
बातमी अपडेट होत आहे.
