पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या इन्स्टाग्रामवर भारतात बंदी, वाणी कपूरने उचलले मोठे पाऊल; चाहते देखील हैराण

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारतात बॅन केल्यानंतर सहकलाकार वाणी कपूरने मोठे पाऊल उचलले आहे.

पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या इन्स्टाग्रामवर भारतात बंदी, वाणी कपूरने उचलले मोठे पाऊल; चाहते देखील हैराण
vani Kapoor
Image Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: May 04, 2025 | 5:55 PM

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरच्या ‘अबीर गुलाल’ चित्रपटाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. खरं तर, काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि त्याच्या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत होती. याच दरम्यान, भारत सरकारने एक मोठं पाऊल उचलत सर्व पाकिस्तानी कलाकारांचे इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक केले. याच पार्श्वभूमीवर आता ‘अबीर गुलाल’मध्ये फवाद खानसोबत दिसणाऱ्या वाणी कपूरनेही एक मोठं पाऊल उचललं आहे.

खरं तर, भारतात फवाद खानचं इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक होताच वाणीच्या इंस्टाग्रामवरून चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट अचानक गायब झाल्या. यानंतर लोकांना वाटू लागलं की वाणीने स्वतःला या चित्रपटापासून दूर केलं आहे, पण सत्य काही वेगळं आहे. या पोस्ट वाणी कपूरने स्वतः हटवलेल्या नाहीत. खरं तर, चित्रपटाशी संबंधित सर्व पोस्ट फवाद खानने त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केल्या होत्या आणि जेव्हा त्याचं इंस्टा अकाउंट भारतात बंद झालं, तेव्हा त्याने केलेल्या सर्व पोस्टही गायब झाल्या.

वाचा: ‘… तर मी इंग्लंडला निघून जाईन’ भारत-पाक युद्धावर पाकिस्तानी नेत्याची मजेशीर प्रतिक्रिया

‘अबीर गुलाल’च्या सर्व पोस्ट डिलीट

‘अबीर गुलाल’ हा एक रोमँटिक कॉमेडी चित्रपट आहे, ज्यामध्ये वाणी कपूरसोबत पाकिस्तानी अभिनेता फवाद खान दिसणार होता. हा चित्रपट 9 मे 2025 रोजी प्रदर्शित होणार होता. वाणीने या चित्रपटाशी संबंधित अनेक पोस्ट फवाद खानसोबत इंस्टाग्रामवर कोलॅबोरेशन म्हणून शेअर केल्या होत्या. पण आता भारतात फवादचं अकाउंट बंद करण्यात आलं आहे, त्यामुळे त्याच्या कोलॅब पोस्टही वाणीच्या अकाउंटवरून हटवल्या गेल्या आहेत. भारत सरकारच्या नव्या निर्देशांनुसार आता फवाद खानचं इंस्टाग्राम अकाउंट भारतात दिसत नाही.

पहलगाम हल्ल्यानंतर इंस्टाग्राम अकाउंटवर बंदी

त्यामुळे ज्या पोस्टमध्ये फवाद टॅग केलेला होता, त्या पोस्टही वाणीच्या प्रोफाइलवरून हटवल्या गेल्या आहेत. मात्र, या पोस्ट परदेशात अजूनही दिसत आहेत. याचा अर्थ असा की वाणीने स्वतःहून काहीही हटवलं नाही, तर हे सर्व तांत्रिक कारणांमुळे घडलं आहे. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने या चित्रपटावर देशात बंदी घातली आहे. हा हल्ला 22 एप्रिल रोजी झाला होता, ज्यामध्ये 26 पर्यटक मारले गेले होते. या घटनेनंतर सरकारने कठोर पावलं उचलत केवळ चित्रपटाच्या प्रदर्शनावरच बंदी घातली नाही, तर त्याच्याशी संबंधित डिजिटल कंटेंटही हटवला आहे.