
Hardik Pandya New GF : भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या क्रिेकेटच्या मैदानात कायम नवे विक्रम रचताना दिसतो. पण हार्दिक त्याच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असतो. आता पुन्हा हार्दिक नव्या गर्लफ्रेंडमुळे चर्चेत आला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हार्दिक याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टेनकोविक हिच्यासोबत घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर हार्दिक आणि जास्मिन वालिया यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला. पण यावर हार्दिक याने कधीच अधिकृत घोषणा केली नाही. आता अभिनेत्री माहिका शर्मा हिच्यासोबत हार्दिक याच्या नावाची चर्चा सुरु आहे.
सांगायचं झालं तर, हार्दिक याने 2020 मध्ये नताशा हिच्यासोबत लग्न केलं. पण 2025 च्या सुरुवातीला दोघांनी घटस्फोटाची घोषणा देखील केली. दोघांनी त्यांचं वेगळं होणं सौहार्दपूर्ण असल्याचं वर्णन केलं होतं आणि असंही म्हटलं होतं की त्यांचा मुलगा अगस्त्य त्यांची सर्वात मोठी प्राथमिकता राहील. घटस्फोटानंतर पुन्हा हार्दिक एका नव्या नात्यामुळे चर्चेत आला आहे.
रेडिट एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हार्दिक याच्या नव्या नात्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. व्हिडीओमध्ये एक सेल्फी दिसत आहे. ज्याच्या हार्दिक याची अस्पष्ट झलक दिसत आहे. त्यानंतर एका पोस्टमध्ये जर्सी नंबर 33 चा उल्लेख करण्यात आला आहे. जे बहुतेकदा हार्दिक पंड्याशी जोडलं जातं. यानंतर, ऑनलाइन फोरमवर नवीन स्पर्धा, नवीन प्रेयसी अशा कमेंट व्हायरल होऊ लागल्या.
चाहत्यांच्या लक्षात आलं आहे की, माहिका आणि हार्दिक एकमेकांना फॉलो करत आहेत. यानंतर, माहिकाचा एक फोटो व्हायरल झाला ज्यामध्ये तिने हार्दिक पांड्यासारखा गाउन घातलेला दिसत आहे. पण यावर हार्दिक आणि माहिका यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, माहिका मॉडेलींग आणि अभिनय श्रेत्रात सक्रिय आहे. तिने तनिष्क, विवो, युनिक्लो सारख्या ब्रँडसाठी जाहिराती आणि व्हिडिओ केले आहेत. याशिवाय, ती अनेक सिनेमे आणि ब्रँड मोहिमांचा देखील भाग राहिली आहे. सोशल मीडियावर माहिका कामय सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.