इंडियन आयडॉलवरही कोरोनाचं संकट, पवनदीपनंतर आता आशिष कुलकर्णी पॉजिटीव्ह, शोचं काय होणार?

Harshada Bhirvandekar

|

Updated on: Apr 16, 2021 | 12:58 PM

या आठवड्यात, प्रोटोकॉलनुसार, सर्व स्पर्धकांनी चित्रिकरणापूर्वी कोरोना चाचणी केली आहे. ज्यामध्ये आशिषचा अहवाल सकारात्मक आला आहे. आता तो हॉटेलच्या खोलीतूनच आपले सादरीकरण करेल.

इंडियन आयडॉलवरही कोरोनाचं संकट, पवनदीपनंतर आता आशिष कुलकर्णी पॉजिटीव्ह, शोचं काय होणार?
आशिष कुलकर्णी

मुंबई : देशभरात कोरोना विषाणूची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत. दररोज कोट्यवधी लोक या विषाणूच्या विळख्यात अडकत आहेत. प्रसिद्ध सिंगिंग शो ‘इंडियन आयडॉल 12’च्या (Indian Idol 12) सेटवरून आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकताच या शोचा एक स्पर्धक पवनदीप राजन (Pawandeep Rajan) हा कोरोनाच्या विळख्यात अडकला होता. आता आणखी एक स्पर्धक आशिष कुलकर्णी (Ashish Kulkarni) याला देखील कोरोनाची लागण झाली आहे. आशिषलाही कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. आशिषला पवनदीपसोबत क्वारंटाईन करण्यात आले आहे (Indian Idol 12 fame contestant Ashish Kulkarni tested corona positive).

या आठवड्यात, प्रोटोकॉलनुसार, सर्व स्पर्धकांनी चित्रिकरणापूर्वी कोरोना चाचणी केली आहे. ज्यामध्ये आशिषचा अहवाल सकारात्मक आला आहे. आता तो हॉटेलच्या खोलीतूनच आपले सादरीकरण करेल. आशिषला कोरोनाची लागण झाल्याबाबत चॅनलवर कोणतीही अधिकृत पुष्टीकरण झाले नाही किंवा अद्याप कोणतेही निवेदनही समोर आले नाही. काही काळापूर्वी शोचा आणखी एक स्पर्धक पवनदीप हादेखील या विषाणूच्या विळख्यात अडकला होता.

बाबा रामदेव असणार या आठवड्याचे खास पाहुणे

या कार्यक्रमाच्या ‘रामनवमी स्पेशल शो’मध्ये बाबा रामदेव पाहुणे परीक्षक म्हणून येणार आहेत. ते कोरोना निगेटिव्ह झाल्यावर पुढे काय करावे, यासंबंधी पवनदीप आणि आशिष दोघांनाही खास टिप्स देताना दिसणार आहे. तसेच, ते दोघांनाही आशीर्वादही देतील, जेणेकरुन दोघेही लवकरात लवकर बरे व्हावे (Indian Idol 12 fame contestant Ashish Kulkarni tested corona positive).

आदित्य नारायणही कोरोना पॉझिटिव्ह!

‘इंडियन आयडॉल 12’चा होस्ट आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आदित्यने सोशल मीडियावर आपण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. आदित्यची पत्नी श्वेता हीला घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले असताना, त्याला मात्र रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता दोघांनीही या विषाणूवर मात केली असून, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

कार्यक्रमाचे काय होणार?

पवनदीप-आशिषला कोरोना झाल्यावर त्यांच्याबरोबर राहणारे सर्व स्पर्धक क्वारंटाईन होतील की, शूटिंग सुरू राहील? असा प्रश्न सर्वाना पडला आहे. स्पर्धकांव्यतिरिक्त इंडियन आयडॉलचे परीक्षक हिमेश रेशमिया, नेहा कक्कर आणि विशाल दादलानी यांचीही दररोज कोरोना चाचणी घेण्यात येत आहे. शोमध्ये येणाऱ्या सर्व पाहुण्यांनाही सेफ्टी प्रोटोकॉलमधून जावे लागते.

मनोरंजन उद्योगात कोरोनाचा शिरकाव

तथापि, चॅनलकडून यावर कोणतेही अधिकृत पुष्टीकरण झालेले नाही, किंवा कोणतेही विधान दिले गेले नाही. पण इंडियन आयडॉलच्या आधी ‘डान्स दिवाने’च्या सेटवर देखील तीन स्पर्धकांना कोरोनाची लागण झाली आहे. देशभरात कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत आणि करमणूक उद्योग देखील या साथीच्या प्रादुर्भावापासून वाचू शकलेला नाही. गेल्या काही दिवसांमध्ये अक्षय कुमार, आलिया भट्ट, रुपा गांगुली, सीमा पहावा, विक्की कौशल, भूमि पेडणेकर आणि कतरिना कैफ यासारख्या अनेक सेलेब्रिटींना कोरोनाची लागण झाली आहे.

(Indian Idol 12 fame contestant Ashish Kulkarni tested corona positive)

हेही वाचा :

Sonu Sood | विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली म्हणून सोनू सूदने चालवली सायकल, कोरोनाचे नियम विसरल्याने झाला ट्रोल!

बावधनच्या बगाड यात्रेतील 134 जण कोरोना पॉझिटिव्ह, साताऱ्यात मालिकांची शूटिंग बंद

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI