बिपाशा बासू पुन्हा प्रेग्नंट आहे? मिनी ड्रेसमधला बिपाशाचा अवतार पाहून नेटकरीही गोंधळले
अभिनेत्री बिपाशा बासूचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील तिचा ड्रेस अन् तिचा अवतार पाहून ती पुन्हा एकदा प्रेग्नंट आहे का अशा चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु झाल्या आहेत.

बिपाशा बासू बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. पण ती सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामाध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. ती अनेकदा तिचा पती करण सिंग ग्रोव्हर आणि मुलगी मालतीसोबतचे तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तसेच बिपाशाला तिच्या वाढलेल्या वजनामुळे देखील अनेकदा ट्रोलही करण्यात आलं. आताही तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे.
बिपाशाचे चाहते देखील आश्चर्यचकित झाले आहेत
हा व्हिडीओ पाहून बिपाशाचे चाहते देखील आश्चर्यचकित आणि गोंधळले आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर, बहुतेक लोक असा अंदाज लावत आहेत की बिपाशा दुसऱ्यांदा आई होणार आहे. व्हिडिओमध्ये बिपाशासोबत करण सिंग ग्रोव्हर आणि मुलगी देवी देखील दिसत आहेत.
बिपाशा करण सिंग ग्रोव्हर आणि मुलगी देवीसोबत बाहेर फिरायला गेली होती. खरंतर, बिपाशा नुकतीच तिच्या कुटुंबासोबत बाहेर गेली होती. यादरम्यान तिने पिवळ्या रंगाचा मिनी ड्रेस आणि ओव्हरसाईज शर्ट घातला होता. तिच्यासोबत असणारा करण पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि बेज रंगाच्या ट्राउझर्समध्ये दिसत होता. करण बाहेर बिपाशाची वाट पाहत उभा असलेला व्हिडीओमध्ये दिसत आहे. एवढंच नाही तर बिपाशा बाहेर येते तेव्हा ती पती करणसोबत पोज देतानाही दिसत आहे. पण त्यावेळी ती वजनामुळे स्वत:च थोडीशी अवघडल्यासारखी दिसत होती.
View this post on Instagram
प्रेग्नेंसीची चर्चा सुरू
व्हिडिओमध्ये बिपाशाचे वजन पूर्वीपेक्षा खूप वाढलेले दिसत आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक युजर्स कमेंट करताना विचरताना दिसत आहेत की, बिपाशा प्रेग्नेंट आहे का? त्याच वेळी, काहींनी अभिनेत्रीच्या वाढलेल्या वजनावर आश्चर्य व्यक्त केले आहे. काही वापरकर्त्यांना अभिनेत्रीचा ड्रेसिंग सेन्स देखील आवडला नाही, ज्यामुळे वापरकर्त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका वापरकर्त्याने कमेंट करत लिहिले ‘असे दिसते की ती दुसऱ्यांदा प्रेग्नेंट आहे.’ त्याच वेळी, एकाने लिहिले ‘बिपाशाची चालण्याची पद्धत थोडी विचित्र वाटतेय का? ती प्रेग्नेंट आहे का?’
बिपाशा आणि करण यांचे लग्न
बिपाशाने 2016 मध्ये करण सिंग ग्रोव्हरशी लग्न केले आणि सहा वर्षांच्या लग्नानंतर, 2022 मध्ये या जोडप्याने मुलगी देवीचे या जगात स्वागत केले. बिपाशाचे हे पहिले लग्न असले तरी, करण सिंग ग्रोव्हरचे हे तिसरे लग्न आहे.