Jackie Chan: मार्शल आर्टिस्ट आणि अभिनेता जॅकी चॅनचे निधन? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल

Jackie Chan: बॉलिवूड लीजेंड धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या अफवांनंतर आता आंतरराष्ट्रीय स्टार जॅकी चॅन यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सोशल मीडियावर दावा केला जात आहेत की जॅकी यांचे चार दिवसांपूर्वीच निधन झाले आहे.

Jackie Chan: मार्शल आर्टिस्ट आणि अभिनेता जॅकी चॅनचे निधन? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
Jacky Chain
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Nov 11, 2025 | 2:54 PM

बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती सध्या गंभीर आहे. ते काही दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. सोमवारपासून धर्मेंद्र यांच्या निधनाच्या खोट्या बातम्या व्हायरल होत आहेत. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले की धर्मेंद्र रुग्णालयात आहेत आणि त्यांची स्थिती स्थिर आहे. धर्मेंद्र यांच्यानंतर आता आणखी एका दिग्गज अभिनेत्याच्या मृत्यूची अफवा पसरली आहे. हा अभिनेता म्हणजे जॅकी चॅन.

जॅकी चॅन यांच्याबाबत सोशल मीडियावर दावा केला जात आहे की मार्शल आर्टिस्ट आणि दिग्गज अभिनेता जॅकी चॅन यांचे निधन झाले आहे. काही युजर्सचे म्हणणे आहे की 71 वर्षीय जॅकी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. मात्र, या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही. लोक जॅकी यांच्या फोटो आणि व्हिडीओंसोबत चुकीच्या बातम्या पसरवत आहेत.

jackie-chan

जुन्या जखमेमुळे निधनाचा दावा

सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे हेही सांगितले गेले की दिग्गज अभिनेत्याचे चार दिवसांपूर्वीच निधन झाले. ही पोस्टही चार दिवस जुनी आहे. त्यात लिहिले आहे, “आज, जगातील सर्वात प्रिय व्यक्तिमत्त्व, आमच्या सर्वांच्या हृदयात वसलेल्या (जॅकी चॅन) व्यक्तीचे निधन झाले आहे. विशेषतः आमच्या पिढीसाठी, एक योग्य अभिनेता, एक महान कोंग फू योद्धा, एक मजेदार हसणारा व्यक्ती, जॅकी चॅन यांचे निधन झाले आहे.” पोस्टमध्ये जॅकी यांचा फोटोही शेअर करण्यात आला आहे.

jackie-chan

दुसऱ्या एका पोस्टमध्ये दावा केला गेला, “71 वर्षीय जॅकी चॅन यांना काही वर्षांपूर्वी लागलेल्या जखमेमुळे काही त्रास झाला आणि नंतर त्यांचे निधन झाले. हॉलिवूड लीजेंड्सनी त्यांना श्रद्धांजली दिली आहे आणि कुटुंबानेही याची पुष्टी केली आहे.” पण दुसरीकडे अनेक युजर्सनी फेक न्यूज पसरवणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहेत. एका युजर्सने लिहिले, “फेसबुक जॅकी चॅन यांना का मारायचे आहे?” एकाने लिहिले, “आज इंटरनेट जॅकी चॅन यांना मारण्याचा प्रयत्न करत आहे.”

10 वर्षांपूर्वीही उडाली होती मृत्यूची अफवा

ही पहिली वेळ नाही जेव्हा जॅकी चॅन यांच्या निधनाची अफवा पसरली आहे. दहा वर्षांपूर्वी म्हणजे 2015 मध्येही जॅकी यांच्याबाबत असे दावे करण्यात आले होते. तेव्हा अभिनेत्याने स्वतः खोट्या बातम्यांचा खंडन करताना सांगितले होते, “मी फ्लाइटमधून उतरलो तेव्हा दोन बातम्यांनी मला हैराण केले. पहिली गोष्ट, मी अजून जिवंत आहे आणि दुसरी गोष्ट रेड पॉकेट्सबाबत माझ्या नावाचा वापर करून Weibo वर होणाऱ्या घोटाळ्यावर विश्वास ठेवू नका.”