जॅकी श्रॉफने सर्वांसमोर असं काही केलं, ज्यामुळे माधुरी दीक्षित झाली अन्कम्फर्टेबल? व्हिडीओ व्हायरल

'देवदास'मधील चुन्नीलाल आणि चंद्रमुखी म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांची नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'च्या सेटवर भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी जॅकी श्रॉफने माधुरीच्या हातावर किस केलं.

जॅकी श्रॉफने सर्वांसमोर असं काही केलं, ज्यामुळे माधुरी दीक्षित झाली अन्कम्फर्टेबल? व्हिडीओ व्हायरल
माधुरी दीक्षित, जॅकी श्रॉफ
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 21, 2026 | 10:42 AM

संजय लीला भन्साळींच्या ‘देवदास’ या चित्रपटाच अभिनेत्री माधुरी दीक्षितने चंद्रमुखी आणि अभिनेता जॅकी श्रॉफने चुन्नीलालची भूमिका साकारली होती. बऱ्याच वर्षांनंतर हे दोघं ऑफस्क्रीन एकमेकांसमोर आलेय ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या सेटवर जॅकी आणि माधुरी यांची भेट झाली. या भेटीचा व्हिडीओ लगेच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. परंतु त्यातील एका गोष्टीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होऊ लागली आहे. यावेळी माधुरीने ऑफ शोल्डर ड्रेस परिधान केला होता, तर जॅकीसुद्धा सुटाबुटात आला होता. माधुरी आणि जॅकी यांनी पापाराझींसमोर एकत्र फोटोसाठी पोझ दिले. परंतु त्यापूर्वी जॅकीने तिच्या हातावर किस केलं. त्यानंतर माधुरीच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले. पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करताच त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.

सेटवर जेव्हा माधुरी आली, तेव्हा तिला पाहून जॅकी खूपच खुश झाला होता. तिचं स्वागत करताना जॅकीने माधुरीचा हात हातात घेऊन किस केलं. त्यानंतर दोघांनी पापाराझींसमोर फोटोसाठी एकत्र पोझ दिले. हा व्हिडीओ पाहून आता नेटकऱ्यांमध्येच दोन गट पडले आहेत. काही नेटकरी जॅकी श्रॉफ आणि माधुरीला एकत्र पाहून खूप खुश आहेत. तर काहीजण माधुरीला ट्रोल करत आहेत. ‘माधुरीला कदाचित ही गोष्ट आवडली नाही, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव लगेच बदलले’, असं एकाने लिहिलं. तर ‘माधुरीला जॅकीसोबत फोटो काढायचा नव्हता का? ती इतकी नाराज का दिसतेय’, असा सवाल दुसऱ्या युजरने केला. ‘माधुरी भावच देत नाहीये’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. फोटो काढून झाल्यानंतर माधुरी तिथून बाजूला निघून जाते.

माधुरी दीक्षित आणि जॅकी श्रॉफ यांनी बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. राम लखन, खलनायक, 100 डेज, प्रेम दिवाने यांसारख्या चित्रपटांमध्ये दोघांनी भूमिका साकारल्या आहेत. हे सर्व चित्रपट आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत. एका जुन्या मुलाखतीत जॅकीने हेसुद्धा मान्य केलं होतं की, नव्वदच्या दशकात त्याचं माधुरीवर जबरदस्त क्रश होता. म्हणजेच जॅकीला माधुरी दीक्षित खूप आवडायची.