सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही; जावेद अख्तर यांनी कर्मभूमीचे मानले आभार
खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज (17 मे) प्रकाशन पार पडले. पुस्तकात ईडीच्या कारवायांपासून ते त्यांच्यावर झालेल्या प्रत्येक आरोपाचा उल्लेख केला आहे. दरम्यान यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. जावेद अख्तरही उपस्थित होते. त्यांनी त्यांच्या स्टाइलने त्यांचे मनोगत व्यक्त केले आहे.

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज (17 मे) प्रकाशन पार पडले. पुस्तकात ईडीच्या कारवाया, सरकारचा धाकदपटशा, ईडी, सीबीआयच्या नोटिसांमुळे विरोधी पक्षातील आमदार आणि खासदारांचं गळालेलं आवसान आणि त्यानंतर झालेले पक्षांतर यावर भाष्य करण्यात आलं आहे. तसेच कोठडीतील अनुभवावरही या पुस्तकात लिहिलं गेलं आहे.
जावेद अख्तर यांच्याकडून संजय राऊतांचे कौतुक
पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. शरद पवार , साकेत गोखले, जावेद अख्तर असे अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. एवढंच नाही तर संजय राऊतांनी या पुस्तकाची त्यातीस घटनांची थोडीशी ओळख करून दिल्यानंतर उपस्थित असलेल्या मान्यवरांनीही त्यांचे मनोगत व्यक्त केले. यावेळी जावेद अख्तर यांनीही त्याचे मनोगत व्यक्त केले एवढेच नाहीतर संजय राऊतांबद्दलही भरभरून बोलले. ते म्हणाले “संजय राऊत हे टी 20 चे खेळाडू आहेत. ते चौकार आणि षटकारच मारतात. ते घाबरतही नाही. पण ते चेंडू स्टेडियम बाहेरच टोलवत असतात. माझे त्यांच्याशी चांगले संबंध आहेत.” असं म्हणत संजय राऊतांचं कौतुकही केलं.
संजय राऊतांना मिश्कील सल्ला
पुढे ते म्हणाले, ” जगातील सत्ताधीश विरोधकांना तुरुंगात टाकतात. त्यांना विचार करायला संधी देतात. असं करू नये. कारण त्यांना बाहेर बिझी ठेवा. संजय राऊत तुम्ही तुरुंगात जा असं म्हणणार नाही. पण या पुस्तकाने तुम्ही आमच्या लेखकांच्या जमातीत आला आहात. तुम्ही आता बाहेर राहूनही पुस्तकं लिहा.” अशी मिश्लकील टिपणीही केली.
“सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही.”
त्यानंतर त्यांनी त्यांच्या कर्मभूमीबद्दल म्हणजे मुंबईबद्दलही मनभरून कौतुक केलं. ते म्हणाले ” मी मुंबईत आलो. मी जे काही मिळवलं ते मुंबई आणि महाराष्ट्राने दिलं. सात जन्मात मुंबईचं कर्ज फेडू शकणार नाही. जेव्हा समजू लागलं. तेव्हा बोलू लागलो. गेल्या 30 वर्षात मला चार वेळा पोलीस संरक्षण मिळालं. मी कधी स्टुडियोतून आलो तर पोलीस घरी असायची. चारपैकी तीनवेळा मुल्लांकडून धमकी आली. पूर्वी एएन रॉय पोलीस आयुक्त होते. त्यांनी मला संरक्षण दिलं. त्यामुळे मुंबईला मी कधीही विसरू शकणार नाही” असं म्हणत त्यांनी आपल्या कर्मभूमीचे मनापासून आभार मानले.