AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अल्पावधीत मोठा नफा म्हणत जयवंत वाडकरांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट; अखेर नको तेच घडलं..

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक वेगळीच पोस्ट पाहून नेटकरी संभ्रमात पडले. त्यानंतर अनेकांनी त्यांना मेसेज करत अकाऊंट हॅक झाल्याची माहिती दिली.

अल्पावधीत मोठा नफा म्हणत जयवंत वाडकरांच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट; अखेर नको तेच घडलं..
जयवंत वाडकरImage Credit source: Instagram
| Updated on: May 03, 2026 | 10:12 AM
Share

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते जयवंत वाडकर यांचं सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर येत आहे. क्रिप्टो घोटाळ्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सायबर फसवणूक करणाऱ्यांनी हा अकाऊंट हॅक केल्याचं कळतंय. याप्रकरणी जयवंत वाडकर यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करून त्याचा वापर एका फसव्या बिटकॉइन गुंतवणूक योजनेचा प्रचार करण्यासाठी करण्यात आला. यामुळे त्यांच्या अकाऊंटवरील फॉलोअर्सची दिशाभूल झाली. जयवंत वाडकर यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करून त्यावर एक पोस्ट अपलोड करण्यात आली होती. त्या पोस्टमध्ये युजर्सना ‘किम्बर्ली मुरिलो’ नावाच्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं होतं आणि त्यात कथित क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग सेवांचा प्रचार करणारी एक फेसबुक लिंक जोडण्यात आली होती.

ही पोस्ट माझ्या 60 हजार फॉलोअर्ससोबत शेअर करण्यात आली, अशी माहिती जयवंत वाडकर यांनी दिली. या पोस्टमध्ये फॉलोअर्समध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्यांना एका फसव्या योजनेत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आलं. याप्रकरणी नोडल सायबरने अज्ञात हॅकर्सविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपींचा डिजिटल मागोवा घेत आहेत. जयवंत वाडकर हे 2014 पासून सोशल मीडियावर सक्रिय असून त्यांचे 60 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

‘अल्पावधीत मोठा नफा’ मिळेल असा दावा करत युजर्सना एका कोचशी संपर्क साधण्याचं आवाहन या पोस्टद्वारे करण्यात आलं होतं. यासाठी फेसबुक लिंक देण्यात आली होती. शेअर करण्यात आलेल्या स्क्रीनशॉट्समध्ये बँक खात्यात मोठी रक्कम जमा झाल्याचं दाखवण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये जयवंत वाडकर यांचं नाव वापरून विश्वासार्हता निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. या संपूर्ण प्रकारामुळे जयवंत वाडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रासही झाला. सुदैवाने काही जागरूक युजर्सनी जयवंत वाडकर यांना अकाऊंट हॅक झाल्याचा मेसेज पाठवला. त्यानंतर ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी सायबरकडे तक्रार दाखल केली. याआधी इतर सेलिब्रिटींच्या बाबतीतही अशा घटना घडल्या आहेत. सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या फसवणुकीबाबत अधिक जागरुक राहण्याचं आवाहन वाडकरांनी चाहत्यांना केलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या अकाऊंट्सची माहिती, पासवर्ड, ओटीपी कोणासोबत शेअर करू नका, असं पोलिसांनी सांगितलं आहे. अकाऊंट हॅक होऊ नये यासाठी सतत काही महिन्यांनी पासवर्ड बदला आणि तो पासवर्ड साधासोपा ठेवू नका, असंही पोलिसांनी म्हटलंय.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?