अखेर जेठालाल आणि बबिताचं झालं लग्न? दयाबेन वाढतेय लग्नात जेवण, व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते खूश

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बबिता आणि जेठालाल यांचे लग्न झाल्याचे दिसत आहे. तसेच या लग्नात दयाबेन जेवण वाढताना दिसत आहे.

अखेर जेठालाल आणि बबिताचं झालं लग्न? दयाबेन वाढतेय लग्नात जेवण, व्हायरल व्हिडीओ पाहून चाहते खूश
TMKOC
Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Aug 15, 2026 | 10:33 AM

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय आणि चर्चेत राहिला शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा.’ या शोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हा शो कायम काही तर नवीन घेऊन येत असतो. जेठालाल हे मुख्य पात्र कायमच बबिताच्या प्रेमात असल्याचे दाखवण्यात आले आहे. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओने जेठालालचे स्वप्न पूर्ण केले आहे. थेट व्हिडीओमध्ये जेठालाल आणि बबिताचे लग्न दाखवण्यात आले आहे.

व्हायरल व्हिडीओ नेमका काय?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या क्लिपमध्ये जेठालाल आणि बबीताजी यांचे साउथ इंडियन पद्धतीने लग्न दाखवण्यात आले आहे. त्यात दोघे एकमेकांना वरमाळा घालताना दिसत आहेत. दयाबेन जेवण शिजवत आहे आणि चंपकलाल टोमॅटो कापत आहेत. बापूजी, डॉक्टर हाथी आणि सोढी बसून गप्पा मारत आहेत. मग दयाबेन बबीताची साडीही नीट करते. संपूर्ण गोकुळधाम एकत्र बसून जेवण करतात. बबीताजी आणि जेठालालही जेवत आहे. हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाला असून अनेकजण यावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच एका फॅनने लिहिले की, जेठाचे आयुष्य आनंदाने भरून गेले. दुसऱ्या एका चाहत्याने लिहिले की, भारतात एआय शेवटचा श्वास घेईल. एका युजरने म्हटले की, यातही पोपटलालचे लग्न झालेले नाही. एकाने म्हटले की, एआयही पोपटलालचे लग्न लावू देऊ शकला नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ हा खरा व्हिडीओ नसून एआयच्या माध्यमातून बनवलेला व्हिडीओ आहे.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’चा प्रोमो

शोच्या लेटेस्ट प्रीकॅपमध्ये एफडीएच्या तपासाची कथा दाखवण्यात आली आहे. त्यात माधवी भिडे ज्या घरी बनवलेले लोणचे आणि पापड विकतात. त्यांना एफडीए अधिकाऱ्यांकडून एक नोटीस मिळते, जेव्हा ते त्यांच्या उत्पादनांची तपासणी करतात. या प्रीकॅपने सोशल मीडियावरही लोकांचे लक्ष वेधले आहे. व्हायरल होत असलेल्या या प्रीकॅपमध्ये, एफडीएच्या दोन अधिकाऱ्यांनी आत्माराम आणि माधवी भिडेकडे येऊन त्यांना सांगितले, ‘तुमच्या लिंबू-मिरचीच्या लोणच्यात काचेचा एक तुकडा सापडला आहे. यामुळे तुमचा परवाना रद्द करण्यात आला आहे. तुम्हाला काही सांगायचे असेल तर आमच्या ऑफिसमध्ये येऊन सांगा.’

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us