Jhalak Dikhhla Jaa 10: गश्मीर, रुबिना नव्हे तर ‘या’ स्पर्धकाने जिंकलं ‘झलक दिखला जा 10’चं विजेतेपद

'झलक दिखला जा 10'च्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ही गोष्ट; विजेत्याने जिंकले इतके लाख रुपये

Jhalak Dikhhla Jaa 10: गश्मीर, रुबिना नव्हे तर 'या' स्पर्धकाने जिंकलं 'झलक दिखला जा 10'चं विजेतेपद
गश्मीर, रुबिना नव्हे तर ' या ' स्पर्धकाने जिंकलं ' झलक दिखला जा 10'चं विजेतेपद Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 28, 2022 | 7:49 AM

मुंबई: कलर्स वाहिनीवरील ‘झलक दिखला जा 10’ या डान्स रिॲलिटी शोचा ग्रँड फिनाले नुकताच पार पडला. मोठमोठ्या सेलिब्रिटींना मात देत आठ वर्षांच्या गुंजन सिन्हाने शोचं विजेतेपद मिळवलं. तिच्यासोबत 12 वर्षांचा तिचा डान्सिंग पार्टनर आणि कोरिओग्राफर सागर यांचाही सन्मान करण्यात आला. रुबिना दिलैक आणि फैजल शेख य दोघांना गुंजनने हरवलं. तर गुंजन, रुबिना, फैजल यांच्यासह गश्मिर महाजनी, श्रीती झा आणि निशांत भट्ट हे स्पर्धक टॉप 6 मध्ये पोहोचले होते.

विजेत्याचं नाव घोषित करण्याआधी परीक्षक करण जोहरने सांगितलं की, “डान्स रिॲलिटी शोच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या ग्रँड फिनालेमध्ये अशी गोष्ट घडतेय. ‘झलक दिखला जा 10’च्या तिन्ही स्पर्धकांमध्ये बरोबरीचा सामना झाला आहे. मात्र इंटरनॅशनल डान्स फॉरमॅटचा विचार करून आम्ही विजेता ठरवतोय.”

हे सुद्धा वाचा

गुंजन, तिचा साथीदार तेजस आणि कोरिओग्राफर सागर यांना 20 लाख रुपये बक्षीस म्हणून मिळालं. याआधी गुंजनने ‘डान्स दिवाने ज्युनिअर’ या रिॲलिटी शो मध्ये भाग घेतला होता. मात्र हा शो ती जिंकू शकली नव्हती. त्यानंतर हार न मानता तिने झलक दिखला जा 10 मध्ये भाग घेतला. या शोच्या परीक्षकांमध्ये करण जोहरसह माधुरी दिक्षित आणि नोरा फतेही यांचा समावेश होता.

कोण आहे गुंजन सिन्हा?

आठ वर्षांच्या गुंजनचा जन्म 2014 मध्ये गुवाहाटीमध्ये झाला. आपल्या दमदार नृत्य कौशल्याच्या जोरावर अत्यंत कमी वयात गुंजनने नाव कमावलं. गुंजनचे वडील रणधीर सिन्हा हे पोलीस अधिकारी आहेत तर आई हिमाद्री गृहिणी आहे. अत्यंत कमी वयापासूनच गुंजनने नृत्याचं प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. डान्स दिवाने ज्युनिअर या शोमध्ये तिने कोरिओग्राफर सागर बोरा याच्यासोबत भाग घेतला होता. या शोच्या ग्रँड फिनालेपर्यंत गुंजन पोहोचली होती. मात्र ती हा शो जिंकू शकली नव्हती.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.