मुंबई: बॉलिवूड इंडस्ट्रीत असे काही कलाकार आहेत, ज्यांनी मोजक्या भूमिका साकारल्या आहेत. मात्र त्याच भूमिकांमुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. अशा काही अभिनेत्यांपैकी जिमी शेरगिलचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, ‘मोहब्बतें’, ‘लगे रहो मुन्नाभाई’, ‘स्पेशल 26’, ‘तनू वेड्स मनू’, ‘अ वेडनस्डे’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या. चित्रपट असो किंवा वेब सीरिज, जिमी शेरगील त्याच्या जबरदस्त अभिनयकौशल्याने विशेष छाप सोडतो. जिमी जवळपास गेल्या 26 वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत कार्यरत आहे. पण क्वचितच लोकांना माहीत असेल की त्याला 18 वर्षांचा मुलगा आहे.