John Abraham Fees : जॉनने या चित्रपटासाठी घेतले इतके कोटी रूपये, अवघ्या बॉलिवूडमध्ये चर्चा

जॉनचा मार्केट रेट सध्या वाढतच आहे. बाटला हाऊस दरम्यान जॉनला सत्यमेव जयतेपेक्षा जास्त पैसे मिळाले होते. यानंतर जॉनला सत्यमेव जयते 2 मध्ये बाटला हाऊसपेक्षा जास्त फी देण्यात आली. जॉनला पठाण या चित्रपटात काम करण्यासाठी २० कोटी रुपये देऊन साइन केले होते, अशी चर्चा त्यावेळी होती. आता तो एक व्हिलन रिटर्न्ससाठी २१ कोटी रुपये घेत असल्याने मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.

John Abraham Fees : जॉनने या चित्रपटासाठी घेतले इतके कोटी रूपये, अवघ्या बॉलिवूडमध्ये चर्चा
अभिनेता, जॉन अब्राहम
Follow us
| Updated on: Jan 17, 2022 | 9:16 PM

मुंबई – जॉन अब्राहम (john abraham) हा बॉलिवूडमधील (bollywood) प्रतिभावान अभिनेत्यांपैकी एक आहे. जॉन एकापेक्षा एक जबरदस्त अॅक्शन चित्रपट करत असतो, आणि चाहत्यांना त्याचा अवतारही नेहमी पसंतीला पडतो. जॉन आता हळूहळू त्याची फी वाढवत असल्याचे वृत्त आहे. सत्यमेव जयते आणि बाटला हाऊसपासून (batla house) जॉन आपली फी वाढवली असून आता बॉलीवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, जॉनने त्याच्या येणारा चित्रपट ‘एक व्हिलन रिटर्न्स’साठी मोठी रक्कम मागितल्याची चर्चा संपुर्ण बॉलिवूडमध्ये आहे. तसेच मागितलेली रक्कम निर्मात्यांनी जॉनला दिली आहे, साधारण सूरीच्या चित्रपटासाठी २१ कोटींमध्ये साइन केले आहे.

जॉनचा मार्केट रेट सध्या वाढतच आहे. बाटला हाऊस दरम्यान जॉनला सत्यमेव जयतेपेक्षा जास्त पैसे मिळाले होते. यानंतर जॉनला सत्यमेव जयते 2 मध्ये बाटला हाऊसपेक्षा जास्त फी देण्यात आली. जॉनला पठाण या चित्रपटात काम करण्यासाठी २० कोटी रुपये देऊन साइन केले होते, अशी चर्चा त्यावेळी होती. आता तो एक व्हिलन रिटर्न्ससाठी २१ कोटी रुपये घेत असल्याने मोठा चर्चेचा विषय ठरला आहे.

‘एक व्हिलन रिटर्न’ चित्रपटाबाबत बोलायचे झाल्यास, जॉन व्यतिरिक्त रितेश देशमुख, अर्जुन कपूर, दिशा पटानी आणि तारा सुतारिया चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मोहित सुरी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून याआधी त्याने एक व्हिलनचे दिग्दर्शनही केले होते ज्यात सिद्धार्थ मल्होत्रा, रितेश देशमुख आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून सध्या निर्मितीचे काम असल्याची माहिती मिळत आहे.

‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटाबद्दल बोलताना मोहित म्हणाला, ‘एक व्हिलन हा माझा पॅशन प्रोजेक्ट होता. आजपर्यंत त्या चित्रपटाला मिळालेल्या प्रेमाबद्दल मी सदैव ऋणी राहीन. मला आशा आहे, की एक व्हिलन रिटर्न्ससोबत प्रेम वाढेल. मी या चित्रपटाबद्दल जास्त काही सांगू शकत नाही, पण चित्रपटात एक रोलरकोस्टर राईड पाहायला मिळणार आहे.

अपशब्द वापरला त्यावेळी मला थोबडायला हवं होतं, मानेंचा सहकलाकारांना सवाल

 सचिन खेडेकर बनला अल्लू अर्जुनचा आजोबा! आणखी एक तेलुगू सिनेमा हिंदीतून करणार अजूबा?

किरण माने प्रकरणावर राष्ट्रवादीचं ‘नो कॉमेंट’, प्रिया बेर्डे म्हणतात, मला समजायला मार्ग नाही!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.