Radhe VS SMJ 2 | सलमान खान आणि जॉन अब्राहमची ‘बॉक्स ऑफिस’ टक्कर टळली, ‘सत्यमेव जयते 2’चे प्रदर्शन लांबणीवर!

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) याचा आगामी चित्रपट 'सत्यमेव जयते 2'  (Satyameva jayate 2)चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता उद्रेक पाहून निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे.

Radhe VS SMJ 2 | सलमान खान आणि जॉन अब्राहमची ‘बॉक्स ऑफिस’ टक्कर टळली, ‘सत्यमेव जयते 2’चे प्रदर्शन लांबणीवर!
सत्यमेव जयते 2

मुंबई : बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) याचा आगामी चित्रपट ‘सत्यमेव जयते 2’  (Satyameva jayate 2)चे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता उद्रेक पाहून निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली असल्याचे, निवेदन निर्मात्यांनी प्रसिद्ध केले. तथापि, त्यांनी अद्याप नवीन रिलीज तारखेविषयी काहीही सांगितले नाही (John Abraham upcoming movie Satyameva jayate 2 release postpone due to corona pandemic).

या निवेदनात असे लिहिले आहे की, ‘या संकटाच्या वेळी आम्ही लोकांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेत आपल्या आगामी ‘सत्यमेव जयते 2′ चित्रपटाची तारीख ठरावलेल्या दिवसापासून पुढे ढकलत आहोत. आम्ही आपल्याला चित्रपटाशी संबंधित अधिक माहिती देत ​​राहू. तोपर्यंत सुरक्षित अंतर ठेवा आणि मास्क घाला, स्वतःची आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या, जय हिंद!’

पाहा निवेदन

(John Abraham upcoming movie Satyameva jayate 2 release postpone due to corona pandemic)

सलमान खान स्पर्धा करणार नाही!

आतापर्यंतच्या रिलीजच्या तारखेनुसार जॉनची बॉक्स ऑफिसवर सलमान खानशी ‘टक्कर’ होणार होती. वास्तविक, जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’ हा चित्रपट सलमान खानचा चित्रपट ‘राधे’ बरोबर प्रदर्शित होत होता. ही टक्कर पाहण्यासाठी चाहते देखील खूप उत्साही झाले होते, पण आता ‘सत्यमेव जयते 2’ची रिलीज डेट बदलली आहे, ही स्पर्धा देखील टाळण्यात आली आहे.

मिलाप झवेरी दिग्दर्शित या चित्रपटात मनोज बाजपेयी यांच्यासह अनेक स्टार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. 2018च्या अ‍ॅक्शन ड्रामा ‘सत्यमेव जयते’  चित्रपटाचा हा सिक्वल आहे. या चित्रपटात दिव्या खोसला कुमार देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे (John Abraham upcoming movie Satyameva jayate 2 release postpone due to corona pandemic).

यापूर्वी देखील ‘सत्यमेव जयते’चे दिग्दर्शन मिलाप झवेरी यांनीच केले होते आणि 2018 च्या स्वातंत्र्य दिनी  हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचा पहिला भाग अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटाशी स्पर्धा करत होता, पण सत्यमेव जयते या चित्रपटाला चाहत्यांनी खूप पसंती दिली होती.

पठाणमधून करणार धमाका

याशिवाय ‘पठाण’ या चित्रपटातही जॉन अब्राहम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘पठाण’मध्ये जॉन व्यतिरिक्त शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटात जॉन व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. सिद्धांत आनंद यांच्या दिग्दर्शनाखाली बनवलेल्या ‘पठाण’ चित्रपटाचे शूटिंग यश राज स्टुडिओमध्ये सुरू झाले आहे.

शाहरुख खानचे चाहते यावर्षी त्याच्या कमबॅकची वाट पहात होते. पण त्याच्या चाहत्यांना अजून एक वर्ष वाट पाहावी लागणार आहे. यशराज बॅनरखाली बनलेला हा चित्रपट या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये रिलीज होणार नाही आणि पुढच्या वर्षी बॉक्स ऑफिसवर धमाका करेल. याशिवाय जॉन ‘एक व्हीलेन 2’मध्येही दिसणार आहे. दिशा पाटनीसह जॉन अब्राहम मोहित सूरीच्या या चित्रपटात झळकणार आहे.

(John Abraham upcoming movie Satyameva jayate 2 release postpone due to corona pandemic)

हेही वाचा :

छेडछाड करताच ‘दंगल गर्ल’ने लगावली कानशिलात, मुक्का पडताच वडील आले मदतीला धावून…

Kangana Ranaut | इंस्टाग्रामवर भडकली ‘बॉलिवूड क्वीन’, म्हणाली पुढच्या निवडणुकीत भाजपसाठी ठरू शकतो धोकादायक!   

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI