
मराठी चित्रपटसृष्टीमधील ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे काल, 16 ऑगस्ट रोजी निधन झाले आहे. त्यांची ‘ठरलं तर मग’ मालिकेतील पूर्णा आजी ही भूमिका विशेष गाजली. त्यांनी वयाच्या 69व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांना धक्का बसला असला आहे. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेत्री जुई गडकरीने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
काय म्हणाली जुई गडकरी?
‘ठरलं तर मग‘ या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच ज्योती चांदेकर या मालिकेत पूर्णा आजीच्या भूमिकेत दिसत होत्या. त्यामुळे जुई आणि ज्योती यांच्यामध्ये चांगले नाते होते. ज्योती चांदेकर यांच्या अचानक जाण्याने जुईला देखील धक्का बसला. तिने सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचा फोटो शेअर करत ‘मला हे मान्यच नाही… तु फसवलस आजी‘ असे म्हटले आहे.
वाचा: अभिनेत्री तेजस्विनी पंडितवर कोसळला दु:खाचा डोंगर, आईचे निधन
ज्योती चांदेकर यांच्याविषयी
गेल्या 2-3 दिवसांपासून ज्योती चांदेकर या आजारी होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. काल, 16 ऑगस्ट रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे नेमकं कारण समोर आलेले नाही. त्यांच्या पश्चात त्यांच्या दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या मोठ्या मुलीचे नाव पोर्णिमा पंडित आहे तर धाकटी मुलगी अभिनेत्री तेजस्विनी पंडित देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे.
ज्योती चांदेकर यांनी आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. त्या गेली कित्येक वर्ष मराठी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी गेल्याच वर्षी, वयाच्या 68व्या वर्षी स्वत:ची कार खरेदी केली होती. त्यावेळी तेजस्विनी पंडितने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला होता. ज्योती यांनी ‘गुरु‘, ‘ढोलकी‘, ‘तिचा उंबरठा‘, ‘पाऊलवाटा‘, ‘सलाम‘, सांजपर्व अशा अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले. त्यांना स्टर प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतही काम केले. तसेच त्या तू सौभाग्यवती हो, छत्रीवाला या मालिकांमध्येही महत्त्वाच्या भूमिकेत दिसल्या.