AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kajal Aggarwal Birthday : बैकग्राउंड ते साऊथची टॉपची अभिनेत्री, काजल आग्रवालची जबरदस्त कारकीर्द

काजल अग्रवालने कॅप्शन दिले आहे की तिने आधीच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. काजल अग्रवालने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर प्री बर्थडे पार्टीचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.

Kajal Aggarwal Birthday : बैकग्राउंड ते साऊथची टॉपची अभिनेत्री, काजल आग्रवालची जबरदस्त कारकीर्द
बैकग्राउंड ते साऊथची टॉपची अभिनेत्री, काजल आग्रवालची जबरदस्त कारकीर्दImage Credit source: tv9
| Updated on: Jun 19, 2022 | 6:22 AM
Share

मुंबई : साऊथ (South Movies) आणि बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal Birthday) आज म्हणजेच 19 जून रोजी वाढदिवस साजरा करत आहे. पण अभिनेत्री काजल अग्रवालने एक दिवस आधी एका खास व्यक्तीसोबत सेलिब्रेशन केले आहे. अभिनेत्री काजल अग्रवालने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. यासोबतच काजल अग्रवालने कॅप्शन दिले आहे की तिने आधीच तिचा वाढदिवस साजरा केला आहे. काजल अग्रवालने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट इंस्टाग्रामवर प्री बर्थडे पार्टीचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजे अभिनेत्री काजल अग्रवालने तिचा वाढदिवस तिच्या पती, कुटुंब आणि मुलगा नीलसोबत नाही तर  खास व्यक्तींसोबत साजरा केला आहे. या सेलिब्रेशन तिने तिच्या मित्रांसोबत केले आहे.

सेलिब्रेशनचे फोटो

View this post on Instagram

A post shared by Kajal A Kitchlu (@kajalaggarwalofficial)

कालजलची बॉलिवून कारकीर्द

आपल्या दमदार अभिनयाने आणि हॉटनेसने सगळ्यांना वेड लावणारी बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल यंदा तिचा 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. काजलचा जन्म 19 जून 1985 रोजी मुंबईत झाला. काजलने बॉलिवूडशिवाय तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्येही काम केले आहे. काजल ‘सिंघम’, ‘स्पेशल 26’ आणि ‘दो लफ्जों की कहानी’ सारख्या चित्रपटात दिसली होती. काजलला बॉलीवूडमध्ये तिची जादू पसरवता आली नसली तरी ती साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे.

जाहिरातीतही झळकली

तिच्या फिटनेसपासून ते लक्झरी लाइफपर्यंत काजल नेहमीच चर्चेत असते. काजल एका वर्षात जवळपास 14 कोटी रुपये कमावते. आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात करण्यापूर्वी काजलने अनेक जाहिरातींमध्येही काम केले होते. काजल अग्रवाल सेलिब्रेटी क्रिकेट लीगची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणूनही प्रतिनिधित्व करते.

बॅकग्राऊंड डान्सरही राहिली

काजलने सेंट अॅन्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर काजलने मुंबईच्या केसी कॉलेजमधून मास मीडिया स्ट्रीममध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. काजलने तिच्या करिअरची सुरुवात बॅकग्राउंड डान्सर म्हणून केली होती. ‘क्यों हो गया ना’ या चित्रपटात ती बॅकग्राउंड डान्सरच्या भूमिकेत दिसली होती, असे म्हटले जाते. काजल असेही म्हणते की ती हिंदी चित्रपट करणे सुरूच ठेवेल परंतु तामिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये काम करणे कधीही थांबवणार नाही, कारण तिथूनच तिची कारकीर्द सुरू झाली. काजलच्या लाईफस्टाईलबद्दल बोलायचे झाल्यास तिच्याकडे अनेक आलिशान मालमत्ता आहेत. त्यामध्ये BMW, Range Rover, Mini Cooper आणि Audi सारख्या आलिशान गाड्या आहेत ज्यांची किंमत करोडो आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.