AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ही तर दुसरी जया बच्चन.. म्हणणाऱ्यांना काजोलचं सडेतोड उत्तर; सांगितलं पापाराझींवर रागावण्याचं खरं कारण

अभिनेत्री जया बच्चन नेहमीच पापाराझी किंवा फोटोग्राफर्सवर भडकताना दिसून येतात. काही दिवसांपूर्वी काजोलसुद्धा पापाराझींवर राग व्यक्त करताना दिसली. त्यानंतर तिची जया बच्चन यांच्याशी तुलना झाली. त्यावर आता काजोलने प्रतिक्रिया दिली आहे.

ही तर दुसरी जया बच्चन.. म्हणणाऱ्यांना काजोलचं सडेतोड उत्तर; सांगितलं पापाराझींवर रागावण्याचं खरं कारण
Kajol and Jaya BachchanImage Credit source: Instagram
| Updated on: Jun 24, 2025 | 1:44 PM
Share

अभिनेत्री काजोल सध्या तिच्या ‘माँ’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्त ती विविध मुलाखती देत असून अनेक कार्यक्रमांमध्येही उपस्थित राहत आहे. अशाच एका कार्यक्रमातील काजोलचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ती पापाराझींवर चिडलेली दिसून आली होती. त्यावरून तिची तुलना ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या स्वभावाशी करण्यात आली. जया बच्चनसुद्धा नेहमी पापाराझींवर रागावताना दिसतात. त्या सतत फोटोग्राफर्सना ओरडताना दिसून येतात. काजोलसुद्धा आता त्यांच्याच सारखी वागू लागल्याचं नेटकरी म्हणू लागले. या तुलनेवर आता खुद्द काजोलने प्रतिक्रिया दिली आहे. पापाराझी तुम्हाला तसं वागण्यासाठी भाग पाडतात, असं ती म्हणाली. इतकंच नव्हे तर कोणाच्याही अंत्यविधीला पापाराझींना पाहून खूप विचित्र वाटत असल्याचं तिने म्हटलंय.

‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काजोल म्हणाली, “जर तुम्हाला मी भीतीदायक वाटत असेन, तर ठीक आहे. कृपया माझा ‘माँ’ हा चित्रपट पहा. मला असं वाटतं की हल्ली सगळंकाही व्हिडीओंच्या माध्यमातूनच होत असतं. पापाराझीसुद्धा तेच करतात. तुम्ही काहीतरी म्हणाल, याची ते वाट पाहतात. जोपर्यंत तुम्ही त्यांना एखादी प्रतिक्रिया देत नाही, तोपर्यंत ते तुमच्या मागे लागतात, सतत प्रश्न विचारतात. त्यांच्यावर ओरडणं चुकीचंच आहे. परंतु त्यांना आपण शांतपणे सांगू शकतो की, फोटो काढण्यासाठी ओरडण्याची गरज नाही. तुम्ही शांत व्हा.”

“हे सर्व फक्त फोटो किंवा व्हिडीओ काढण्याबद्दल नाहीये. त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते. कारण त्याच्यासोबत एक टॅगलाइन जोडलेली असते किंवा त्यांना एखादी नकारात्मक टॅगलाइन जोडायची असते”, अशी तक्रार काजोलने केली. पापाराझींबाबत मी थोडी जागरूकच असते, असंही तिने स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे अंत्यविधीच्या ठिकाणी पापाराझींनी येऊ नये, असं मत काजोलने मांडलं आहे.

“माझ्या मते, काही जागा अशा असतात, जिथे त्यांनी जायला नाही पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या अंत्यविधीला ते जेव्हा कलाकारांच्या मागे पळतात आणि फोटो क्लिक करतात, ते पाहून मला खूप विचित्र वाटतं. हे सर्व मला अपमानास्पद वाटतं. इतकंच काय, तर सहज कुठे जेवायला गेलो तरी ते पाठलाग करत मागे येतात. जुहू ते वांद्र्यापर्यंत ते आमचा पाठलाग करत येतात. मी कुठे जातेय, कोणाला भेटते, कोणत्या इमारतीत जाते हे सर्व पाहण्यासाठी ते असं करतात. मला या सगळ्यांचा त्रास होतो”, असं ती स्पष्टपणे म्हणाली.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.