AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kajol Marriage: ‘माझ्या नवऱ्यापासून दूर राहा नाहीतर…’, जेव्हा महिला खासदाराने टाकला काजोल – अजय यांच्या नात्यात मिठाचा खडा

Kajol Marriage: 'माझ्या नवऱ्यापासून दूर राहा नाहीतर...', संसारात मिठाचा खडा पडतोय समजताच कजोलने दिली महिला खासदाराला धमकी, नवऱ्या देखील रागात म्हणाली..., तेव्हा सर्वत्र सुरु होती अजय देवगन यांच्या एक्ट्रा अफेअरची चर्चा...

Kajol Marriage: 'माझ्या नवऱ्यापासून दूर राहा नाहीतर...',  जेव्हा महिला खासदाराने टाकला काजोल - अजय यांच्या नात्यात मिठाचा खडा
| Updated on: Aug 05, 2024 | 1:17 PM
Share

अभिनेत्री काजोल आणि अभिनेता अजय देवगन यांचा आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. दोघांनी देखील अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्थान पक्क केलं आहे. आज काजोल – अजय बॉलिवूडचे पॉव्हर कपल म्हणून ओळखले जातात. दोघांच्या संसाराला 25 वर्ष झाली आहेत. पण एक काळ असा होता जेव्हा अजय – काजोल यांच्या संसारमध्ये तिसऱ्या महिलीची एन्ट्री झाली होती. अजय याच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरच्या चर्चा फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील तुफान रंगू लागल्या होत्या. ज्या महिलेसोबत अजय याचं लग्नानंतर नाव जोडलं जात होतं, ती महिला दुसरी तुसरी कोणी नसून अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत आहे…

अनेक मीडिया रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार, कंगना आणि अजय यांच्यातील जवळीक दिवसागणिक वाढत होती. ज्याचा त्रास काजोल हिला होऊ लागला होता. ‘वन्स अपोन ए टाइम इन मुंबई’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान कंगना – अजय यांच्यातील जवळीक वाढली होती.. असं देखील अनेकदा सांगण्यात आलं. जेव्हा दोघांच्या नात्याचं सत्य काजोल पर्यंत पोहोचलं, तेव्हा काजोल हिने कंगना आणि अजय दोघांना देखील धमकावलं होतं.

अजय – कंगना यांच्या नात्याबद्दल माहिती होताच, काजोल हिने मुलांना घेऊन घर सोडण्याची धमकी अभिनेत्याला दिली होती. तेव्हा अजय याने देखील कंगना हिच्यासोबत काम करणं बंद केलं. एवढंच नाहीतर, काजोल हिने कंगनाला देखील धमकावलं होतं, ‘माझ्या नवऱ्यापासून दूर राहा, हेच तुझ्यासाठी चांगलं आहे…’ असं रागात काजोल म्हणाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, अजय देवगन याला देखील कंगना आवडू लागली होती. त्यामुळे अभिनेत्याने तेज आणि रासकल्स यांसारख्या सिनेमांमध्ये कंगना हिला कास्ट करण्यास सांगितलं होतं. कंगनाला निर्माते आणि दिग्दर्शकांचा विरोध होता. अजय देवगन याच्यामुळे कंगनाला सिनेमांमध्ये काम मिळालं. पण काजोल हिने धमकावल्यानंतर अजय याने कंगनासोबत काम करणं बंद केलं. त्यानंतर दोघे कधीच एकत्र दिसले नाहीत.

खासदार कंगना रनौत

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या तुफान चर्चेत आहे. कंगना हिने नुकतीच लोकसभा निवडणूक 2024 मध्ये हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर जिंकली आहे. कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?