AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘काला हिरण’वरून सलमान खानचा कोर्टात लढा; मेकर्स म्हणाले, अद्याप रिलीजसाठी तयार नाही..

सलमान खान आणि 'काला हिरण' चित्रपट निर्मात्यांमध्ये कायदेशीर लढाई सुरू आहे. दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली, ज्यात सलमानने त्याच्या नावाने व प्रतिमेशी संबंधित खास गोष्टींचा वापर करून प्रतिमा खराब होत असल्याने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली. मात्र हा चित्रपट अद्याप तयार नसून सेन्सॉर प्रमाणपत्र मिळाले नसल्याचं निर्मात्यांनी सांगितलं.

‘काला हिरण’वरून सलमान खानचा कोर्टात लढा; मेकर्स म्हणाले, अद्याप रिलीजसाठी तयार नाही..
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Sep 10, 2026 | 8:56 PM
Share

‘काला हिरण: द बॅटल फॉर लीगल’ या चित्रपटावरून मेकर्स आणि अभिनेता सलमान खान (Salman Khan) या दोघांमध्ये सध्या कायदेशीर लढाई सुरू आहे. याचप्रकरणी आज दिल्ली हायकोर्टात महत्वाची सुनावणी पार पडली. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित करण्यासाठी तयार नाही आणि त्याला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्रही मिळालेलं नाही, असं निर्मात्यांनी न्यायालयात सांगितलं. अभिनेता सलमान खानने चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. या चित्रपटात त्याच्या नावाचा, ओळखीचा आणि त्याच्याशी संबंधित खास गोष्टींचा परवानगीशिवाय वापर करून त्यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सलमानने केला आहे.

आज दिल्ली हायकोर्टामध्ये न्यायमूर्ती ज्योती सिंह यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी सलमान खान याच्या वतीने करण्यात आली. यावर न्यायालयाने चित्रपट निर्मात्याला दोन आठवड्यांच्या आत आपलं उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

निर्मात्यांचं म्हणणं काय ?

दरम्यान, निर्मात्यांच्या वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केलं की, हा चित्रपट अद्याप प्रदर्शनासाठी तयार झालेला नाही. तसेच, चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडूनही प्रमाणपत्र मिळालेलं नसून तो अद्याप प्रमाणपत्रासाठी बोर्डाकडे पाठवण्यातही आलेला नाही. चित्रपटाचा ट्रेलरही अद्याप प्रदर्शित करण्यात आलेला नाही, असं नमूद करण्यात आलं.

न्यायालयाने निर्मात्यांचं हे म्हणणं नोंदवून घेतले असून, 14 सप्टेंबर रोजी, काला हिरन चित्रपटाच्या प्रस्तावित प्रदर्शनाची तारीख स्पष्ट करा, असं निर्माता अमित जानी यांच्या वकिलांना सांगितलं. तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित करू नये, असेही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं.

सलमान खान यांच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान सांगितलं की, हा चित्रपट सप्टेंबरमध्ये प्रदर्शित करण्याबाबत निर्माते बोलत आहेत. चित्रपट अचानक प्रदर्शित झाल्यास सलमान खान यांच्या प्रतिमेचं मोठं नुकसान होऊ शकतं, असा युक्तिवाद त्यांनी केला. “समजा चित्रपट प्रदर्शित झाला, तर त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते” असा युक्तिवाद वकिलांनी केला. आता याप्रकरणावर पुढील सुनावणी 30 सप्टेंबर रोजी होणार आहे.

यापूर्वी जुलै महिन्यात उच्च न्यायालयाने काला हिरन चित्रपटाचा टीझर आणि त्याच्याशी संबंधित इतर पोस्ट ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून हटवण्याचा अंतरिम आदेश दिला होता. ‘काला हिरन’चे निर्माते हे सलमान खानच्या नावाचा, त्याच्या शैलीचा आणि त्याच्याशी संबंधित इतर खास गोष्टींचा त्याच्या परवानगीशिवाय व्यावसायिक फायदा घेऊ शकत नाहीत, असं न्यायालयाने म्हटलं होतं. तसेच, त्याच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारा कोणताही मजकूर किंवा कंटेंट प्रसारित करता येणार नाही, असंही नमूद केलं.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...