
मुंबई | प्रेम ही एक अशी भावना आहे.. ज्यापुढे व्यक्ती सर्वकाही विसरतो आणि फक्त आपल्या आवडत्या व्यक्तीच्या मनाचा विचार करतो. बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत, ज्यांनी कोणत्याही गोष्टीचा विचार न करता फक्त आणि फक्त भावनांना अधिक महत्त्व दिलं. अशाच कपलपैकी एक म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा. गेल्या अनेक वर्षांपासून अर्जुन आणि मलायका एकमेकांना डेट करत आहेत. एवढंच नाही तर, काही वर्षांपूर्वी दोघांनी सर्वांसमोर त्यांच्या नात्याची कबुली देखील दिली. अर्जुन आणि मलायका कायम चाहत्यांना कपल गोल्स देत असतात. पण दोघांना विरोध करणाऱ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. आता ट्विटरच्या माध्यमातून बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने अर्जुन कपूर याच्यावर निशाणा साधला आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याचं ट्विट व्हायरल होत आहे.
मलायका अरोरा हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याने आणि विश्लेषकाने अर्जुन कपूर याच्यावर निशाणा साधला आहे. पुढच्या पाच वर्षांमध्ये अर्जुन कपूर यांचं करियर उद्ध्वस्त होईल असं म्हणणारा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून केआरके आहे. केआरके कायम ट्विटरच्या माध्यमातून बॉलिवूडच्या प्रसिद्ध सेलिब्रिटींवर निशाणा साधत असतो.
ट्विट करत केआरके म्हणाला, ‘जर आज तू अभिनेता बनू शकलास तर पुढे भारताचा सुपरस्टार होवू शकतो. मला विश्वास आहे येत्या पाच वर्षांमध्ये तुझं करियर उद्ध्वस्त होणार आहे. आज अर्जुन कपूर घरात बसून आहे आणि फक्त मलायकाची सेवा करत आहे…’ सध्या केआरकेचं ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
I told to Arjun Kapoor @arjunk26 that if you can become actor then every Indian can become superstar. So I believe that your career will be finished within next 5years. Today Arjun Kapoor is sitting at his home and doing Sewa of Malaika Arora.
— KRK (@kamaalrkhan) July 13, 2023
सांगायचं झालं तर, अर्जुन आणि मलायकाच्या नात्याच्या चर्चा सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असतात. अनेकदा दोघांनी देखील होत असलेल्या विरोधाला सडेतोड उत्तर दिलं. पण तरी देखील अर्जुन आणि मलायका यांच्या नात्याला विरोध करणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. अनेक ठिकाणी अर्जुन आणि मलायका एकत्र दिसतात. शिवाय अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसल्यामुळे सर्वांच्या नजरा अर्जुन आणि मलायका यांच्याकडे येवून थांबलेल्या असतात.
अर्जुन कपूर याच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ‘द लेडी किलर’ सिनेमाच्या माध्यमातून अभिनेता चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमात अर्जुन याच्यासोबत अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि रकुल प्रित सिंग देखील दिसणार आहे. सिनेमात रोमाँटिक कॉमेडी कथेवर आधारलेला असणार आहे.