AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut : ‘गटर पिढी’ म्हणणाऱ्या कंगनाचं जुन्या सिनेमांवरून ट्रोलिंग; वाद वाढताच तोडलं मौन, दिलं सडेतोड उत्तर

Kangana Ranaut: विद्यार्थी आंदोलन आणि Gen Z वरील वक्तव्यांमुळे अभिनेत्री व खासदार कंगना रनौत सतत चर्चेत असतात. बऱ्याच ट्रोलिंगला सामोरे गेल्यानंतर, त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. टीकाकारांना तिने थेट सुनावलं.

Kangana Ranaut : 'गटर पिढी' म्हणणाऱ्या कंगनाचं जुन्या सिनेमांवरून ट्रोलिंग; वाद वाढताच तोडलं मौन, दिलं सडेतोड उत्तर
कंगना रानौत यांची पोस्ट काय ?Image Credit source: social media
| Updated on: Aug 01, 2026 | 8:27 AM
Share

Kangana Ranaut : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत या त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांनी केलेले कोणतेही विधान सोशल मीडियावर काही क्षणांत व्हायरल होतं. दिल्लीतील जंतरमंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनांवर केलेल्या वक्तव्यांमुळे कंगना रानौत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. मात्र, त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचाही सामना करावा लागतान दिसत आहे. सीजपेचे अभिजीत दीपके असोत किंवा सौरव दास, यांनी कंगना रानौत यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करत त्यांच्यावर टीका केली होती. तसेच अभिनेत्री राखी सावंत हिनेही कंगनाला बरंच काही सुनावत तिच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. एवढंच नव्हे तर, आंदोलनातील विद्यार्थ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या कंगना यांच्या जुन्या चित्रपटांतील दृश्यं आणि व्हिडिओ शेअर करत, अनेक सोशल मीडिया युजर्सनीदेखील बरीच टीका केली. मात्र आता या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर कंगनां यांनी मौन सोडत, सडेतोड उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

ट्रोल्सना दिलं ठाम प्रत्युत्तर

शुक्रवारी संध्याकाळी कंगना रानौत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर संसदेत केलेल्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विरोधकांनी त्यांच्या चित्रपटांतील फोटो व्हायरल केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे भाषण केलं होते. चित्रपटांमध्ये ग्लॅमरस किंवा बोल्ड भूमिका साकारणे हा माझा व्यवसाय आहे आणि त्यासाठी मला मानधन मिळतं, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे चित्रपटांमधील किंवा मोठ्या कार्यक्रमांमधील माझी प्रतिमा पाहून तरुणांनीही सार्वजनिक ठिकाणी, शाळेच्या कार्यक्रमांत किंवा क्लबमध्ये तशाच प्रकारे वागावं, असा संदेश देणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे कंगना यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

“तरुणांची दिशाभूल करू नका. चित्रपटसृष्टी आणि खरं आयुष्य, वास्तवातील जीवन यांची तुलना होऊ शकत नाही. आज तुम्ही इतरांच्या मुलांना चुकीचा संदेश द्याल, तर उद्या त्याचे परिणाम तुमच्या स्वतःच्या मुलांनाही भोगावे लागू शकतात” असा डायरेक्ट इशाराच कंगना यांनी दिला.

का झाली होती कंगना यांच्यावर टीका ?

दिल्लीतील तरूणाईच आंदोलन या पार्श्वभूमीवर, विद्यार्थी आंदोलनांवर आणि Gen Z पिढीच्या वर्तनावर कंगना रानौत यांनी काही दिवसांपूर्वी भाष्य केलं होतं. तसेच काही तरुण हिंदू मुलींविषयी केलेल्या त्यांच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. ‘गटर पिढी’ असं म्हणत, त्यांनी जे विधान केलं त्यावरून मोठा संताप उसळला. त्यांच्या या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला. तसेच अनेकांनी कंगना यांच्या जुन्या चित्रपटांतील काही दृश्य शेअर करत त्यांच्या सध्याच्या विधानांतील विरोधाभास दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

मात्र, चित्रपटांमध्ये साकारलेली पात्रे ही केवळ अभिनयाचा भाग असतात. त्यांची तुलना कलाकाराच्या वास्तविक आयुष्याशी करणे किंवा त्यातून तरुणांनी प्रेरणा घेऊन तसाच जीवनक्रम स्वीकारावा, अशी अपेक्षा ठेवणे योग्य नाही, असं म्हणत कंगना यांनी विरोधकांच्या टीकेला थेट प्रत्युत्तर दिलं.

Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता