
बॉलिवूडची क्वीन म्हणजे अभिनेत्री कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. शिवाय अभिनेत्री वादग्रस्त विधान करत वादाच्या भोवऱ्यात असते. कायम वादाचा मुकूट आपल्या डोक्यावर घेऊन मिरवणारी कंगना सध्या निडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त आहे. देशात सर्वत्र निवडणुकीचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार असून 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यात 57 जागांसाठी मतदान होणार आहे.
शेवटच्या टप्प्यात हिमाचल प्रदेशमध्येही मतदान होत आहे, जिथे कंगना भाजपच्या वतीने मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. निवडणुकीच्या आधी कंगना हिचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. गुरवक्ष सिंह ठाकुर नावाच्या एका व्यक्तीने अभिनेत्रीचा फोटो पोस्ट केला आहे. ज्यावर अभिनेत्रीने संताप व्यक्त करत सडेतोड उत्तर दिलं आहे.
गुरवक्ष सिंह ठाकुर यांनी कंगना हिचा फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘भक्तांची देशभक्त अबू सलेम याच्यासोबत देशभक्ती दाखवत आहे… तिचे देशाचा शत्रू अबू सलेमसोबत काही खास क्षण…’ सध्या अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे. अशात कंगना हिने देखील सडेतोड उत्तर दिलं आहे.
फोटोमागील सत्य सांगत कंगना हिने संताप व्यक्त केला आहे. अभिनेत्री म्हणाली, ‘हताश काँग्रेस अधिकारी हा फोटो सर्वत्र व्हायरल करत आहे. मी गँगस्टर अबू सालेमसोबत पार्टी करत असल्याचे कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’चे माजी मनोरंजन संपादक असलेल्या पत्रकार मार्क मॅन्युएल यांनी लिहिलं आहे जे अत्यंत अपमानास्पद आहे.’
‘फोटोत दिसणार व्यक्ती अबू सालेम नाही… एका सिनेमात्या प्रमोशन कार्यक्रमादरम्यानच्या पार्टीचा हा फोटो आहे.’ व्हायरल होत असलेल्या फोटोचा स्क्रिनशॉट शेअर करत अभिनेत्रीवे फोटोमागचं सत्य सांगितलं आहे. सध्या सर्वत्र कंगना हिच्या व्हायरल होत असलेल्या फोटोची चर्चा रंगत आहे.
कंगना हिच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं, अभिनेत्रीचा ‘इमरजेन्सी’ सिनेमा गेल्या काही दिवसांपासून चर्चत आहे. सिनेमा 14 जून रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार होता. पण निवडणुकांमध्ये व्यस्त असल्यामुळे सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. आता सिनेमा कधी प्रदर्शित होणार याबद्दल अधिकृत माहिती मिळालेली नाही.