AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाची चर्चा, नताशा हिची पहिली प्रतिक्रिया, दोन शब्दात म्हणाली…

Natasa Stankovic - Hardik Pandya : हार्दिक पांड्या - नताशा स्टँकोव्हिच यांचा खरंच होतोय घटस्फोट? क्रिकेटपटूच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया थक्क करणारी, दोन शब्दात म्हणाली..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त हार्दिक पांड्या - नताशा स्टँकोव्हिच यांच्या घटस्फोटाची चर्चा...

हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटाची चर्चा, नताशा हिची पहिली प्रतिक्रिया, दोन शब्दात म्हणाली...
| Updated on: May 28, 2024 | 8:50 AM
Share

भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी नताशा स्टँकोव्हिच हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे हार्दिक चर्चेत आला आहे. सांगायचं झालं तर, हार्दिक आणि नताशा यांच्या घटस्फोटाच्या सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगत आहे. नताशा हिने इन्स्टाग्रामवरून ‘पांड्या’ हे नाव काढल्यामुळे दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. आता रंगणाऱ्या चर्चांवर खुद्द नताशा हिने प्रतिक्रिया दिली आहे. सध्या नताशा हिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नताशा हिच्यासोबत एक मिस्ट्री मॅन देखील दिसत आहे. घटस्फोटाच्या चर्चा रंगल्यानंतर नताशा हिला मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट करण्यात आलं. यावेळी नताशा हिला हार्दिक पांड्यासोबत रंगणाऱ्या घटस्फोटाच्या चर्चांबद्दल देखील विचारण्यात आलं. पण नताशा हिने काहीही बोलणं टाळलं. नताशा फक्त ‘थँक्यू सो मच’ हे दोन शब्द म्हणाली आणि त्या मिस्ट्री मॅनसोबत निघून गेली.

घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या नशाता हिच्यासोबत दिसलेला मिस्ट्री मॅन कोण? याची देखील सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नताशा – हार्दिक यांच्या नात्याबद्दल बोललं जात आहे. रिपोर्टनुसार, घटस्फोट झाल्यास हार्दिक यांच्या संपत्तीमध्ये 70 टक्के हिस्सा नताशा हिचा असेल असा दावा करण्यात येत आहे.

पण पूर्वीच हार्दिक याने स्वतःचे संपत्ती आईच्या नावावर केली आहे. हार्दिक याच्याकडे तब्बल 91 कोटी रुपयांची संपत्ती आहे. जर त्यातील 70 टक्के नताशा हिला द्यावे लागले तर, अभिनेत्रीला 63 कोटी द्यावे लागतील… अशी माहिती देखील समोर येत आहे.

दरम्यान, हार्दिक याची एक मुलाखत सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हार्दिक म्हणाला होता, ‘मी सर्वकाही माझ्या आईच्या नावावर केलं आहे. माझ्या कार देखील आईच्या नावावर आहेत. मी स्वतःच्या नावावर काहीही करणार नाही. पुढे जाऊन 50 टक्के मला कोणाला द्यायचे नाहीत… ‘

हार्दिक पांड्या – नताशा स्टँकोव्हिच यांचं नातं

हार्दिक पांड्या – नताशा स्टँकोव्हिच यांना 2020 मध्ये साध्या पद्धतीत लग्न करत चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. लग्नाच्या काही महिन्यांनंतर नताशा हिने मुलगा अगस्त्य याला जन्म दिला. पांड्या कुटुंब चाहत्यांना देखील आवडत होतं. त्यानंतर 2023 मध्ये हार्दिक – नताशा यांनी मोठ्या थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

Follow Us
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल...
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या...
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता
Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता वार्षिक...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद, थेट न्यायालयात..
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद कायम, थेट न्यायालयात याचिका दाखल
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात...
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी...
PUC : केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी नवे नियम जारी...
तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना...
PM Modi : तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना थेट सवाल
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र...
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी
दादरच्या नामकरणावरून संभ्रम दूर! रेल्वे स्थानकाला नाही, मेट्रो...
दादरच्या नामकरणावरून संभ्रम दूर! रेल्वे स्थानकाला नाही, मेट्रो स्टेशनला मिळणार चैत्यभूमी नाव
मुंबई बँक निवडणुकीसाठी शिंदेसेनेची मोठी तयारी; स्वबळावर लढणार? आजच्या
मुंबई बँक निवडणुकीसाठी शिंदेसेनेची मोठी तयारी; स्वबळावर लढणार? आजच्या बैठकीत ठरणार रणनीती!
एकाच आठवड्यात गोकुळ दुधाच्या दारात दुसऱ्यांदा उसळी, किती रुपयांनी...
Gokul Milk : एकाच आठवड्यात गोकुळ दुधाच्या दारात दुसऱ्यांदा उसळी, किती रुपयांनी महागलं?