AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्यूमर सर्जरीनंतर राखी सावंतचा पहिला व्हिडीओ समोर, अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक

Rakhi Sawant : ट्यूमर सर्जरीनंतर राखी सावंतला पहिल्यानंतर चाहत्यांकडून चिंता व्यक्त, अभिनेत्रीची प्रकृती अद्याप चिंताजनक... गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या सर्वत्र राखी सावंत हिच्या प्रकृतीची चर्चा...

ट्यूमर सर्जरीनंतर राखी सावंतचा पहिला व्हिडीओ समोर, अभिनेत्रीची प्रकृती चिंताजनक
| Updated on: May 28, 2024 | 8:10 AM
Share

बॉलिवूडची ड्रामा क्वीन गेल्या काही दिवसांपासून प्रकृतीमुळे चर्चेत आहे. राखीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नुकताच राखीचं ऑपरेशन झालं आहे. राखीच्या यूट्रसमध्ये ट्यूमर होता, तो सर्जरी करून काढण्यात आला आहे. सर्जरीनंतर राखी सावंत हिचा पहिला व्हिडीओ समोर आली आहे. ज्यामध्ये राखी सावंत हिची प्रकृती अद्याप स्थिर नसल्याचं चित्र समोर दिसत आहे. राखी सावंत हिचा रुग्णालयातील व्हिडीओ अभिनेत्रीचा पहिला पती रितेश सिंह याने पोस्ट केला आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र फक्त आणि फक्त राखी सावंत हिच्या व्हिडीओची चर्चा रंगली आहे.

व्हिडीओमध्ये राखी सावंत हिला वेदना होत असल्याची चित्र दिसत आहे. अभिनेत्री व्यवस्थीत उभं देखील राहाता येत नाही. राखी हिला मदत करणारी एक नर्सही सोबत असते. व्हिडिओ शेअर करताना रितेशने कॅप्शनमध्ये आज मी खूप आनंदी आहे… असं लिहिलं आहे.

‘राखी आता लवकरच आपल्या सर्वांमध्ये असेल. तिला चालताना पाहून मला खूप बरं वाटत आहे. चाहत्यांचे आभार…’ सध्या रितेश याने पोस्ट केलेली व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चाहते देखील व्हिडीओ कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. शिवाय अनेकांनी राखी हिची प्रकृती पाहून चिंता देखील व्यक्त केली आहे.

राखीच्या प्रकृतीबद्दल सांगायचं झालं तर, 15 मे रोजी राखी हिच्या छातीत त्रास होऊ लागल्यामुळे अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. राखी हिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा तिचा पहिला पती रितेश देखील तिच्यासोबत होता. रितेश गेल्या काही दिवसांपासून राखीची काळजी घेताना दिसत आहे.

राखी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री आजारी आहे. ज्यामुळे चाहते देखील अभिनेत्रीसाठी प्रर्थना करत आहेत. राखी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

राखी चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. राखी तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी तर, खासगी आयुष्यामुळे अधिक चर्चेत असते. सध्या राखी तिच्या प्रकृतीमुळे चर्चेत आली आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा