‘देश से गद्दारी महंगी पड़ेगी’ – अभिनेत्री कंगना रणौतने दिलजीतवर पुन्हा साधला निशाणा

Kangana Ranaut On Diljit Dosanjh : पंजाबमध्ये पोलिसांच्या कारवाईदरम्यान कंगना रणौतने गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझवर निशाणा साधला आहे. एक मीम शेअर करत कंगनाने दिलजीतला इशाराच दिला आहे.

'देश से गद्दारी महंगी पड़ेगी’ - अभिनेत्री कंगना रणौतने दिलजीतवर पुन्हा साधला निशाणा
Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 1:36 PM

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) पुन्हा एकदा प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझवर (Diljit Dosanjh) निशाणा साधला आहे. कंगनाने सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत असलेले एक मीम शेअर करण्याच्या बहाण्याने दिलजीत दोसांझची खिल्ली उडवली आणि इशार करत त्याला अटक करण्याची धमकीही दिली.

कंगनाने काल (मंगळवारी) ट्विटरवर स्विगी इन्स्टामार्टची एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये विविध प्रकारच्या डाळींची छायाचित्रे दाखवली गेली आहेत. ही पोस्ट शेअर करत कंगनाने लिहीले होते “ओये पल्स आ गई पल्स.” तसेच या पोस्टवर कंगनाने दिलजीतलाही टॅग केले आणि पुढे #Justsaying असे लिहीले आहे.

हे सुद्धा वाचा

कंगनाचा दिलजीतवर निशाणा

मात्र हे प्रकरण केवळ इथेच थांबले नाही. त्यानंतर कंगनाने इंस्टाग्रामवरही यासंदर्भात पोस्ट शेअर केली असून त्यापुढे “दिलजीत दोसांझ जी पोल्स आ गई पोल्स.” असे लिहीले आहे. एवढेच नव्हे तर तिने त्यासोबत धोक्याचे चिन्ह आणि हसणाऱ्या व्यक्तीचा फोटोही मीम स्वरुपात टाकला आहे.

तर पुढल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाने लिहीले आहे की , “ज्यांनी खलिस्तानींना पाठिंबा दिला त्यांनी आता लक्ष द्या आणि लक्षातही ठेवा, पुढचा नंबर तुमचा असेल. पोल्स (पोलिस) आले आहेत. ती वेळ आता गेली, जेव्हा कोणीही काहीही करायचे. देशाशी गद्दारी करण्याचा किंवा (देश) तोडण्याचा प्रयत्न करणे महागात पडेल.” असेही तिने या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

या पोस्टसह कंगनाने पोलिसांच्या बेडीची इमोजी आणि एका महिला पोलिसाचा फोटोसुद्धा शेअर केलाय. यापूर्वीही दिलजीत आणि कंगना यांच्यात सोशल मीडियावर अनेक वाक् युद्ध झाली आहे. मात्र, सध्याच्या कंगनाच्या या पोस्टवर दिलजीतने कोणतेही प्रत्युत्तर दिलेले नाही.

पोलिस घेत आहेत अमृतपालचा शोध

पंजाबमध्ये सध्या पोलीस वारिस पंजाब दे ग्रुपवर जोरदार कारवाई करत आहेत. अनेकांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय ‘वारिस पंजाब दे’चा प्रमुख अमृतपाल सिंग याचाही पोलीस शोध घेत आहेत. पोलीस कारवाईच्या सुरुवातीपासून अमृतपाल सिंग बेपत्ता आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.