AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut about Gen Z : ‘गटर पिढी’ म्हणणाऱ्या कंगना यांचा अचानक यू-टर्न, Gen Z बद्दल चक्क कौतुकोद्गार

कंगना रानौत यांनी आधी Gen Z ला 'गटर पिढी' संबोधून वाद निर्माण केला होता. मोहन भागवत यांनी तरुणांवर विश्वास दाखवल्यावर कंगना रानौत यांनी अचानक 360 डिग्री यू-टर्न घेतला आहे. आता त्या Gen Z ला 'देशाची ताकद' आणि 'भविष्य' म्हणत कौतुक करत आहेत. त्यांच्या या अचानक बदललेल्या भूमिकेमुळे सर्वांनाच आश्चर्य वाटले असून यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Kangana Ranaut about Gen Z : ‘गटर पिढी' म्हणणाऱ्या कंगना यांचा अचानक यू-टर्न,  Gen Z  बद्दल चक्क कौतुकोद्गार
‘गटर पिढी' म्हणणाऱ्या कंगना यांचे अचानक बदलले सूरImage Credit source: social media
| Updated on: Aug 07, 2026 | 3:09 PM
Share

विद्यार्थी आंदोलन आणि Gen Z वरील वक्तव्य, टीकमुळे अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रानौत (Kangana Ranaut) बऱ्याच चर्चेत आल्या होत्या. त्यांनी Gen Z चक्क ‘गटर पिढी’ असं म्हणत त्यांच्यावर टीकेचा भडिमार केला होता. त्यांच्या या विधानाचे बरेच पडसाद उमटले, अनेकांनी संतप्त प्रतिक्रियाही दिल्या. मात्र कंगना या त्यांच्या विधानांवर ठाम होत्या. मात्र आता त्यांनी अचानक यू-टर्न घेतल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांनी तरूणांवर विश्वास दाखवल्यानंतर आता कंगना रानौत यांचेही सूर अचानक मवाळ झाले आहेत. तरूणावईवर नको नको ते आरोप करणाऱ्या कंगना यांनी अचानक 360 डिग्री यू-टर्न घेतला असून त्यांनी Gen Z ला थेट देशाचं भविष्य म्हणत या जनरेशनचं कौतुक केलं आहे. कंगना यांच्या या विधानामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून त्यांच्या वक्तव्याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.

डोळे झाकून कोणवर विश्वास ठेवायचा असेल तर माझा विश्वास ‘जेन झी’वर असेल. आंदोलनकर्त्या मुलांच्या तक्रारी रास्त असून त्यावर संवादाने तोडगा काढणं आवश्यक आहे, अशी भूमिका मोहन भागवत यांनी मांडली होती. त्याचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर आता त्यावर विविध प्रतिक्रिया येत असून अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रानौत यांनीही त्यावर मत मांडलं.  जेन झी बद्दल बोलताना चक्क कौतुक त्यांच्या मुखातून निघालं. टीकेचे सूर मवाळ करून त्यांनी स्तुती केल्याने अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.

जेन-झी तर देशाची ताकद

“जनरेशन झेड (Gen Z) ही आपल्या देशाची ताकद आहे आणि एका अर्थाने आपल्या देशाचा एक मोठा वारसा आहे. मोहन भागवत जी यांना देशात अत्यंत आदराचे स्थान आहे. त्यांच्या ज्ञानाचा, विचारांचा आणि अनुभवांचा लाभ आम्हाला अनेक वेळा घेता आला आहे. देशातील युवा पिढी आपल्या समृद्ध संस्कृतीचे प्रतिनिधी आणि राजदूत म्हणून पुढे येत आहे, ही अत्यंत आनंदाची, समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे” असं कंगना रानौत यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

Follow Us
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडी..
मोठी बातमी! तृणमूल चिन्ह सुनावणीबाबत मोठी अपडेट, न्यायालयाकडून तातडीचे निर्देश
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या...
महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढा; मंगलप्रभात लोढांची बाप्पाच्या चरणी विशेष प्रार्थना
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकरी...
चार एकर सोयाबीन, लाखोंचा खर्च अन् पदरी नुकसान; फडणवीसांसमोर शेतकऱ्यांचा आक्रोश
कणाहीन निवडणूक आयोगाची चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमार...
निवडणूक आयोगाचीच चौकशी करा; राज ठाकरेंनी थेट ज्ञानेश कुमारांना घेरलं
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे...
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली महत्त्वाची माहिती
राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर...
Rahul Gandhi : राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा; ‘वेळ आल्यावर... नेमकं प्रकरण काय?
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार..
मुख्यमंत्री फडणवीस अमरावती वाशिम दौऱ्यावर दुष्काळी परिस्थितीचा घेणार आढावा
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून...
ज्ञानेश कुमार यांच्यामागचा बॉस कोण? संजय राऊतांनी सरळ नावचं सांगून टाकलं