AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीला 1 रुपयाला विकलं, बापानेच…स्वत: सांगितला अंगाचा थरकाप उडवणारा अनुभव!

अभिनेत्री कंगना शर्मा हिने एका इंटरव्ह्यूदरम्यान तिच्या बहिणीवरील अत्याचार आणि मृत्यूबद्दल धक्कादायक खुलासे केले. आई, बहीण आणि मला वडील खूप मारायचे, असंही तिने सांगितलं.

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या बहिणीला 1 रुपयाला विकलं, बापानेच...स्वत: सांगितला अंगाचा थरकाप उडवणारा अनुभव!
Kangana Sharmas shockin revelationImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 20, 2026 | 7:23 PM
Share

‘ग्रेट ग्रँड मस्ती’ ‘मोना होम डिलीव्हरी’, ‘ब्लॅकमेल’ आणि ‘लेट्स प्ले ब्लाइंड’ यासारख्या अनेक चित्रपटांत आणि वेबसीरिजमध्ये झळकलेली अभिनेत्री कंगना शर्मा (kangna Sharma) हिने एका मुलाखतीत आयुष्याची हादरवणारी कहाणी सांगितली. माझे वडील मला, आईला आणि बहिणीला खूप मारहाण करायचे असं तिने सांगितलं. एवढंच नव्हे तर बाबांनी माझ्या बहिणीला अवघ्या 1 रुपयांत विकलं होतं, घाणेरड्या गोष्टी ते बोलायचे असा धक्कादायक खुलासा तिने केला. त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे. तिच्यावरील आपबिती सांगताना कंगनाला अश्रू अनावर झाले. आज माझ्याकडे पैसे- घर सगळं आहे, पण बहिणीची खूप आठवण येते. मी तिला वाचवू शकले नाही, याचा मलाअजूनही पश्चाताप होतो, असं सांगताना तिच्या अश्रूंचा बांध फुटला. सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत तिने अनेक हादरवणारे खुलासे केले.

मी रात्री उठले आणि समोरचं दृश्य पाहून..

तिच्या बहीणीवरील अत्याचारांबद्दल कंगना बोलली. ज्या घरात माझ्या बहिणीचं लग्न झालं, तिथे नको ते धंदे ( वेश्यावृत्ती) चालायचे असं आम्हाला समजलं. लग्नानंतर पहिल्याच रात्री आमच्याकडे, पती-पत्नी एकत्र येत नाहीत. दुसऱ्या दिवशी पगफेरे झाल्यावर ती सासरी गेल्यावर मग फर्स्ट नाईट असते. मी बहिणीसोबत सासरी गेले होते, तेव्हा फक्त 14 वर्षांची होते. रात्री मी वॉशरूमला जाण्यासाठी उठले तेव्हा समोरचं दृश्य पाहून हादरले. माझ्या बहिणीच्या तोंडात कापड होतं, आणि तिच्याशी नको ते केलं जात होतं. मी प्रचंड घाबरले, कोणाशीच काही बोलू शकले नाही, माझी बहीणही हादरली होती, असं कंगनाने सांगितलं.

मी बहीणीसोबत घरी आले, तेव्हा तिने बाबांना सगळं सांगितलं आणि परत सासरी जाण्यास नकार दिला. मात्र माझ्या वडिलांनी तिला थोबाडीत मारली आणि खूप ओरडले, असं कंगनाने नमूद केलं. बहिणीच्या सासरचे तिला नशेच्या गोळ्या देऊन, नको ते काम करवायचे, असा आरोपही तिने केला. मला वाचवा अशी विनंती बहीण करायची. अखेर माझे बाबा तिथे गेले, त्यांनाही संशय आला होता. माझ्या बहिणीची अवस्था खूप वाईट होती, तिला खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. ती बेडवरूनही उठू शकत नव्हती, ते (सासरचे) तिला काय द्यायचे माहीत नाही, असं म्हणत कंगनाने तिच्या बहिणीच्या अत्याचाराची कहाणी कथन केली.

1 रुपयांत हलवायाला विकलं

अखेर बाबा तिला घेऊन घरी आले, नंतर तिचा घटस्फोटही झाला. मात्र बाबांनी अवघा 1 रुपया देऊन पुन्हा तिचं लग्न हलवायाशी लावून दिलं. तोही तिच्याशी खूप वाईट वागला. बहीणीने या लग्नाला नकार दिला, तेव्हाही बाबा तिला खूप वाईट-साईट बोलले. त्या लग्नातही तिचे खूप हाल झाले, अखेर तिला टीबी झाला, कॅन्सरनेही तिला गाठलं होतं, आम्हाला यातलं काहीच माहीत नव्हतं. मी माझ्या बहिणीला वाचव शकलेच नाही, या गोष्टीचा आजही मला प्रचंड पश्चाताप होतो, असं कंगनाने सांगितलं.

Follow Us
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी खाद्य तेलाबाबत घोषणा केलीच...
आता काही खरं नाही! तुकाराम मुंढेंनी घोषणा केलीच...  खाद्य तेलाबाबत एफडीएकडून कडक नियमावली
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरेंवर
जज साहेब...बाळासाहेबांचे विचार...व्यंगचित्रातून शिंदे गटाचा ठाकरे गटावर निशाणा!
पोलिस संरक्षण काढून ये मग... फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर,
Video : पोलिस संरक्षण काढून ये मग...  फलटणमध्ये निंबाळकर vs निंबाळकर, थेट बुलेटस्वारी करत स्वीकारलं चॅलेंज
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान
गद्दारी करून मलाही आमदारकी... ठाकरेंच्या बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत, असं काही घडलं की...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कोर्टात काय...
शिवसेना कोणाची? 2018 ची घटना आणि 19 लाख सदस्यांचा दावा, कामत यांचा युक्तिवाद, ठाकरेंना जिंकून देणार?
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेच्या वकीलांची मोठी मागणी
कोर्टातील युक्तिवाद संपवण्याआधी... ठाकरेंचे वकील देवदत्त कामत यांची कोर्टाकडे मोठी मागणी