AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होमवर्क पूर्ण केला नाही, टीचरआधी ओरडली नंतर दिली कानाखाली, केजीच्या मुलाचा मृत्यू, हार्ट अटॅक ?

एकदा शाळेत मुलाला सोडले म्हणजे पालक निर्धास्त राहतात. मात्र, शाळेतील मुलासंबंधी एखादा अपघात झाला तर शाळा त्याची जबाबदारी कधीच घेत नाही.अशाच एका शाळेत शिक्षेकेने कानाखाली दिल्यानंतर एका मुलाला भोवळ येऊन त्याचा जागीच मृ्त्यू झाल्याचा आरोप होत आहे.

होमवर्क पूर्ण केला नाही, टीचरआधी ओरडली नंतर दिली कानाखाली, केजीच्या मुलाचा मृत्यू, हार्ट अटॅक ?
school teacher cctv
| Updated on: Aug 20, 2026 | 7:29 PM
Share

लहान मुलांना शाळेत शिकण्यासाठी पाठवताना पालक निर्धास्त असतात. मात्र अशा पालकांच्या निर्धास्तपणाला हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. अवघ्या किंडरगार्डनमध्ये शिकणाऱ्या सहा वर्षांच्या मुलाला होमवर्क पुर्ण न केल्याने शिक्षिकेने चांगलेच खडसावले आणि त्यानंतर त्याच्या कानाखाली मारली. या घटनेनंतर हा विद्यार्थी बेशुद्ध होऊन जमीनीवर निपचित पडला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले त्यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषीत केले. या मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा म्हटले जात आहे. सीसीटीव्ही ही घटना कैद झाली आहे. आता पालकांनी मुलाच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावेळी अशी मागणी केली आहे.

कुठे घडला हा प्रकार

ही घटना आंध्रप्रदेशातील विशाखापट्टनम येथे घडल्याचे सांगितले जाते. समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा मुलगा अन्य सहकारी विद्यार्थ्यांसोबत रांगेत उभा असलेला दिसत आहे. फुटेजनुसार मुलगा भेदरलेला आहे. शिक्षक त्याच्या युनिफॉर्मला नीट करताना दिसत आहे. या दरम्याने हे मुल रडू लागले. आणि शिक्षक त्याला कानाखाली मारतात. कानाखाली बसल्यानंतर मुल त्या शिक्षकेवरच पडते. घटनेनंतर शाळेत अफरातफरी माजते. या मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.

CCTV फुटेज पाहिल्यानंतर कुटुंबाचा गोंधळ

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुलांचे पालक आणि नातेवाईक या शाळेत पोहचतात. हा सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर कुटुंबियांनी शाळा प्रशासनाच्या विरोधात नाराजी घेतली. कुटुंबियांनी या मुलाला मारल्याने त्याची तब्येत बिघडली आणि त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, प्रथमदर्शनी या मुलाचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचे म्हटले जात आहे. मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टेमनंतर कळेल असे म्हटले जात आहे. त्यामुळे मुलाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे आता शवविच्छेदन अहवालानंतर येईल असे म्हटले जात आहे.

येथे पोस्ट पाहा –

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात