रेणुकास्वामी हत्या प्रकरणात पोलिसांकडून अखेर या अभिनेत्याला अटक; रिक्षाचालकावर अत्याचार करून मारल्याचा आरोप

रेणुकास्वामी हत्याकांड प्रकरणी कन्नड अभिनेता दर्शन आणि अभिनेत्री पवित्रा गौडा यांना अटक करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन रद्द केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ऑटोरिक्षा चालक रेणुकास्वामीच्या हत्येचा आरोप दर्शनवर आहे. पोलिसांनी दर्शनला त्याच्या अपार्टमेंटमधून आणि पवित्रालाही तिच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.

रेणुकास्वामी हत्या प्रकरणात पोलिसांकडून अखेर या अभिनेत्याला अटक; रिक्षाचालकावर अत्याचार करून मारल्याचा आरोप
Kannada actor Darshan arrested in Renukaswamy murder case, Supreme Court orders his arrest
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 14, 2025 | 7:05 PM

पोलिसांनी कन्नड अभिनेता दर्शन आणि अभिनेत्री पवित्रा गौडा यांच्यावर कारवाई केली आहे. अखेर रेणुकास्वामी हत्याकांड पक्ररणी या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. रेणुकास्वामी हत्याकांडात दोघांनाही दोषी ठरवण्यात आलं आहे. आज, 14 ऑगस्ट रोजी सकाळी सर्वोच्च न्यायालयाने दर्शन, पवित्रा गौडा आणि इतर पाच आरोपींचा जामीन रद्द केला. त्यानंतर काही तासांनंतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

बेंगळुरू पोलिसांकडून अभिनेत्याला अटक

रेणुकास्वामी हत्या प्रकरणातील जामीन रद्द करण्यासोबतच, सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना दर्शनाला लवकरच अटक करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर, बेंगळुरू पोलिसांनी त्याला अटक केली आहे. दर्शनला त्याच्या बेंगळुरूच्या होसकेरेहल्ली येथील प्रेस्टिज साउथ रिज अपार्टमेंटमधून अटक करण्यात आली आहे.

राहत्या घरातून पोलिसांनी केली अटक 

दर्शन या अपार्टमेंटच्या 15 व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 4154 होता. मिळालेल्या माहितीनुसार तो इनोव्हा कारने या अपार्टमेंटमध्ये आला आणि मागच्या गेटने अपार्टमेंटमध्ये त्याने प्रवेश केला पोलीस आले तेव्हा तो त्याच्या फ्लॅटमध्ये उपस्थित होता. त्याला तिथून अटक करण्यात आली. कामाक्षीपाल्य पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर नागेश आणि गोविंदराज नगर पोलिस स्टेशनचे इन्स्पेक्टर सुब्रमण्य यांच्या नेतृत्वाखाली दर्शनला अटक करण्यात आली. पोलिसांनी दर्शनसोबतच पवित्रा गौडाला तिच्या घरातून अटक केली. तिचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये पोलिस तिला घेऊन जाताना दिसत आहेत.


काय प्रकरण आहे?

हे प्रकरण 33 वर्षीय ऑटोरिक्षा चालक रेणुकास्वामीच्या हत्येबद्दल आहे. दर्शन हा या खून प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं म्हटलं जातं. जून 2024 मध्ये रिक्षाचालकाला बेंगळुरूमधील एका शेडमध्ये तीन दिवस डांबून ठेवल्याचा त्याच्यावर आरोप आहे. एवढंच नाही तर त्याच्यावर तिथे अत्याचार करण्यात आले. नंतर त्याचा मृतदेह नाल्यात सापडला होता.

सर्वोच्च न्यायालयाने पवित्रा गौडा आणि इतर पाच आरोपींचाही जामीन रद्द

13 डिसेंबर 2024 रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाने या प्रकरणातील दर्शन आणि इतर आरोपींना जामीन देण्याचा निर्णय दिला होता. तथापि, सर्वोच्च न्यायालयाने त्या निर्णयाला विरोध केला. आणि आता सर्वोच्च न्यायालयाने पवित्रा गौडा आणि इतर पाच आरोपींचाही जामीन रद्द केला आहे.