टेलीप्रॉम्पटर वाचून कपिल शर्मा करतो काॅमेडी! अशाप्रकारे झाली पोलखोल, पहा व्हिडीओ
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. ज्यांना कपिल आवडत नाही त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली.

मुंबई, कॉमेडी किंग कपिल शर्माच्या (Kapil Sharma) जोक्सचे तुम्हीदेखील कदाचीत फॅन असाल. कपिलचा स्टँडअप कॉमेडी ‘द कपिल शर्मा शो’ प्रचंड लोकप्रिय आहे. कपिलचा हजरजबाबीपणा अनेकांना आवडतो. कॉमेडी किंगच्या या कॉमेडीशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये कपिल शर्मा टेलीप्रॉम्पटर (Teleprompter) वाचून जोक्स करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकं कपिलला ट्रोल करत आहेत.
कपिलचा व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये कपिल कॉमेडी करत आहे. स्क्रीन झूम केल्यावर, टेलीप्रॉम्पटर झलक विंडो स्क्रीनवर दिसते. त्यात कपिलचे संवाद लिहिलेले आहेत. व्हिडिओमध्ये कपिलने टेलीप्रॉम्पटर वापरल्याने युजरने आश्चर्य व्यक्त केले. त्या व्यक्तीला वाटायचे की, कपिल स्वतः लक्षात ठेवून सर्व बोलतो आणि विनोद करतो. पण चाहत्याचा हा भ्रम तुटला आणि कपिलचे डायलॉग आणि जोक्स आधीच लिहिलेले असल्याचे त्याला समजले. तो टेलीप्रॉम्पटर वापरून बोलत असल्याचे समोर आले आहे.
View this post on Instagram
कपिलला चाहत्यांचा पाठिंबा
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. ज्यांना कपिल आवडला नाही त्यांनी त्याला ट्रोल करायला सुरुवात केली. पण कपिलला सपोर्ट करणारेदेखील आहेत. लोकांनी कपिलचे पूर्ण कौतुक केले आणि त्याच्या टेलीप्रॉम्पटरचा वापर आवश्यक असल्याचे म्हटले आहे. कपिलचा पर्दाफाश करण्यासाठी व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीला ट्रोल केले जात आहे.
एकाने लिहिले की, मग काय झाले. न्यूज अँकरही तेच करतात. कपिलच्या शोचा आम्ही आनंद घेतो. लोकं हसतात आणि अजून काय पाहिजे. दुसर्याने उपहासाने लिहिले होय, टेलिप्रॉम्प्टर वापरून बोलणे खूप सोपे आहे. तुम्हीही प्रसिद्ध होऊ शकता. कपिलच्या चाहत्याने लिहिले- टेलीप्रॉम्पटर पाहिल्यानंतर बोलणे आवश्यक आहे. हे शूटिंगचे सामान्य वास्तव आहे.
