AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kapil Sharma या कंपनीत करत होता हेल्परचे काम, संघर्ष काळातील गुपीत केले उघड

कपिल शर्मा लवकरच एका नव्या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च इवेंटमध्ये बोलताना कपिलने त्याच्या संघर्ष काळातील काही गोष्टींची आठवण केली.

Kapil Sharma या कंपनीत करत होता हेल्परचे काम, संघर्ष काळातील गुपीत केले उघड
kapil sharma new movie
shailesh musale
shailesh musale | Updated on: Mar 01, 2023 | 5:20 PM
Share

मुंबई : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा याला आज वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. जगभरात त्याचे चाहते आहेत. त्याची कॉमेडी आज अनेकांना हसण्यासाठी प्रवृत्त करते. ज्यामुळे अनेक जण त्यांचं मनापासून कौतूक करतात. कारण त्याच्यामुळे आज अनेकांच्या आयुष्यात हसणं येत आहे. तो सध्या त्याच्या’ज्विगाटो’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे.सर्वांना हसवणारा कपिल या चित्रपटात अतिशय गंभीर व्यक्तिरेखा साकारत आहे. कपिल शर्माने त्याच्या आगामी चित्रपटाबाबत अनेक रंजक किस्सेही शेअर केले आहेत.

Zwigato च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये उपस्थित असताना, कपिलने चित्रपट क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी त्याच्या आयुष्यातील काही गुपीत देखील उघड केले आहेत. नंदिता दास दिग्दर्शित झविगातो या चित्रपटाविषयी बोलताना कपिल म्हणतो, “मी माझ्या आयुष्यात कधीही नंदिता मॅडमसोबत काम करेन असे वाटले नव्हते. मी नेहमीच त्यांचा चाहता आहे. विशेषत: तिचे दोन्ही चित्रपट पाहिल्यानंतर, मी नंदिता मॅमसोबत अशा गंभीर चित्रपटाचा भाग होईल, असे चुकूनही वाटले नव्हते. प्रत्यक्षात नंदिता जी खूपच मजेदार असली तरी. आम्ही सेटवर खूप मजा केली.

डिलिव्हरी बॉयची भूमिका

चित्रपटात डिलिव्हरी बॉयच्या भूमिकेबद्दल बोलताना कपिल म्हणतो, “आपल्या देशातील चित्रपटांमध्ये सामान्य माणसांच्या कथेकडे कुठेतरी दुर्लक्ष केले जाते. पण हा चित्रपट पाहिल्यावर प्रत्येकजण या चित्रपटाशी नाते जोडू शकेल असे वाटते. अर्थात या चित्रपटाची मुख्य भूमिका फूड डिलिव्हरी रायडरवर आधारित आहे. पण जगात अनेक लोक आहेत. ज्यांना नोकऱ्या गमवाव्या लागतात आणि काही काम करावे लागते जे त्यांना मनापासून करायचे नसते. त्यामुळे संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर लोक नक्कीच या व्यक्तिरेखेशी कनेक्ट होऊ शकतील.

कोका-कोला कंपनीत हेल्परचे काम

संघर्षावर चर्चा करताना कपिल म्हणाला, “अनेक लोक मला विचारतात की तू या व्यक्तिरेखेत कसा आलास? त्यामुळे मी एवढेच सांगेन की मी अजून या व्यक्तिरेखेतून बाहेर पडलेलो नाही. कपिल पुढे सांगतो की, “टीव्ही इंडस्ट्रीत येण्यापूर्वी मी माझ्या पॉकेटमनीसाठी अनेक छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्या आहेत. एकदा कॅनडात मी आणि नंदिता मॅम टोरंटो फिल्म फेस्टिव्हलला गेलो होतो. मग नंदिता मॅमशी बोलत असताना मी त्यांच्याशी शेअर केले की मी एकेकाळी कोका कोला कंपनीत हेल्पर म्हणून काम करत असे. कोका कोलापासून कोल्ड्रिंक्सच्या जगात एक नवी क्रांती आली आणि त्या काळात कोका कोलाला सर्वत्र प्रचंड मागणी होती. तेव्हा अॅप नव्हते, त्यामुळे डिलिव्हरीचे काम तितकेसे वेगवान नव्हते. खूप मेहनत करावी लागली.

“जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली तेव्हा नंदिता मॅडमने फूड डिलिव्हरी रायडर्स कसे काम करतात हे खूप संशोधन करून समजावून सांगितले. त्यांना रोज किती समस्यांना तोंड द्यावे लागते. किती अवघड आहे हे काम. त्यामुळे माझ्या शहरातील ते जीवन मी जवळून पाहिले होते. बरं कालानुरूप गोष्टी बदलत राहतात. पण कदाचित ही भूमिका साकारणे माझ्यासाठी अवघड नव्हते.

कपिल गंमतीने म्हणाला की, “विशेषतः जेव्हा नंदिता जी स्वत: एक अभिनेत्री होती, तेव्हा तुम्हाला इच्छा असूनही तुम्ही तिच्यासमोर ओव्हरअॅक्ट करू शकत नाही. ती लगेच पकडते. अशा परिस्थितीत नंदिता जी आणि माझी सहकलाकार शहाना नेहमीच एक अभिनेता म्हणून माझे खूप संरक्षण करायचे. विशेष म्हणजे, कपिल शर्माचा मोस्ट अवेटेड चित्रपट Zvigato 17 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अशा परिस्थितीत कपिलचे चाहते त्याला पुन्हा पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहेत.

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार....
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर प्रकरण गृहमंत्री आणि पालकमंत्र्यांना महागात पडणार; संजय राऊत असं का म्हणाले?
महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
Sanjay Raut : वैचारिक मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या हितासाठी सर्वांनी एकत्र यावं; संजय राऊतांचं मोठं विधान
साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
Matheran Mini Train : पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; साडेचार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर माथेरानची राणी पुन्हा धावली
मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी...
Mumbai Rain Updates : मुंबईत अचानक पावसाची हजेरी, ऑक्टोबरच्या उकाड्यानंतर रिमझिम सरी; वातावरणात गारवा
मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं; राज ठाकरेंचं विधान
Raj Thackeray : मुख्यमंत्र्यांना 2029 पर्यंत ठेवा म्हणजे झालं... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंचं वक्तव्य, CM स्वतःच हसू लागले
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड काय...
मोठी बातमी! फडणवीस आणि ठाकरे बंधू एकाच मंचावर; बंद दाराआड नेमकी काय चर्चा?
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला