
‘टू मच विथ काजोल अँड ट्विंकल’ हा टॉक शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि काजोल मिळून विविध सेलिब्रिटींच्या मुलाखती येतात. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांनी हजेरी लावली होती. यावेळी शोमध्ये करणने त्याच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला. वयाच्या 26 व्या वर्षी मी माझी व्हर्जनिटी गमावली होती, असं त्याने सांगितलं. जान्हवीच्याच कुटुंबातील एका सदस्यासोबत इंटिमेट झाल्याचं म्हणताच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. ‘खरं किंवा खोटं’ या सेगमेंटमध्ये करण जोहरला त्याच्या आयुष्यातील सर्वांत मोठ्या सत्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता.
“तुझ्याबद्दल एखादं खळबळजनक सत्य आम्हाला सांग आणि एक खोटं सांग.. त्यापैकी आम्ही कोणतं खरं किंवा कोणतं खोटं आहे, याचा अंदाज लावू”, असं त्याला विचारलं जातं. त्यावर उत्तर देताना करण सांगतो, “मी वयाच्या 26 व्या वर्षी माझी व्हर्जिनिटी गमावली होती आणि तुझ्या (जान्हवी) कुटुंबातील एका सदस्यासोबत मी इंटिमेट झालो होतो.” हे ऐकून जान्हवी आणि ट्विंकलला आश्चर्याचा धक्का बसतो. त्यानंतर करण पुढे सांगतो, “मी त्या पार्टीला उशिरा गेलो होतो आणि तुझ्या कुटुंबातील एकाही सदस्यासोबत मी इंटिमेट झालो नव्हतो. पण माझ्या डोक्यात तो विचार अनेकदा आला होता.” करणच्या या दोन्ही गोष्टींपैकी कोणती खरी आहे आणि कोणती खोटी… याचा अंदाज आता नेटकरी लावत आहेत.
जान्हवी कपूरने करण जोहर आणि त्याच्या धर्मा प्रॉडक्शन्सच्या बॅनरअंतर्गत ‘धडक’ या चित्रपटातून 2018 मध्ये इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. तेव्हापासून जान्हवी करण जोहरच्या विविध प्रोजेक्ट्समध्ये सातत्याने काम करतेय. ‘गुंजन सक्सेना : द कारगिल गर्ल’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ आणि ‘मिस्टर अँड मिसेस माही’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केलंय. हे सर्व चित्रपट करण जोहरच्या निर्मिर्ती संस्थेअंतर्गत प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे जान्हवी कपूरच्या कुटुंबीयांसोबत करण जोहरचे चांगले संबंध आहेत, हे सहज स्पष्ट होतं.
करण जोहर 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून दोन मुलांचा पिता बनला. यश आणि रुही अशी त्याच्या मुलामुलीची नावं आहेत. विविध मुलाखतींमध्ये करण त्यांच्या संगोपनाविषयी, एकल पालकत्वाविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. आई हिरू यांच्यासोबत मिळून करण त्याच्या दोन्ही मुलांचा सांभाळ करतोय.