Koffee With Karan 7: करण जोहरने डेविड धवनला केलं होतं डेट? KWK 7 मध्ये होणार खुलासा

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: स्वाती वेमूल, Tv9 मराठी

Updated on: Sep 26, 2022 | 4:01 PM

'कॉफी विथ करण 7'च्या फिनाले एपिसोडमध्ये करण जोहर करणार मोठा खुलासा?

Koffee With Karan 7: करण जोहरने डेविड धवनला केलं होतं डेट? KWK 7 मध्ये होणार खुलासा
Karan Johar and David Dhawan
Image Credit source: Instagram

मुंबई: करण जोहरचा (Karan Johar) ‘कॉफी विथ करण 7’ (Koffee With Karan 7) हा शो आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आतापर्यंत या सिझनमध्ये विविध सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या सेलिब्रिटींनी त्यांच्या खासगी आयुष्यातील बरेच खुलासे या टॉक शोमध्ये केले. आता फिनाले एपिसोडमध्ये हे चित्र पलटणार आहे. कारण चार प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स (Social Media Influencers) या फिनाले एपिसोडमध्ये खास पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. नेहमी करण पाहुण्यांना विविध प्रश्न विचारताना दिसतो. मात्र फिनालेमध्ये हे चार पाहुणे करणला विविध प्रश्न विचारणार आहेत. तन्मय भट्ट, दानिश सैत, कुशा कपिला आणि निहारिका एनएम हे चार कॉफी विथ करणच्या फिनालेचे खास पाहुणे आहेत.

कॉफी विथ करणच्या या एपिसोडमध्ये बरेच खुलासे होणार आहेत. मजामस्ती, हास्यविनोदाने परिपूर्ण असा हा एपिसोड असेल. आतापर्यंत करण त्याच्या शोमध्ये आलेल्या पाहुण्यांना त्यांच्या लव्ह-लाईफविषयी खासगी प्रश्न विचारताना दिसला. आता करण जोहरच्या लव्ह-लाईफबद्दल खुलासा होणार आहे.

“तुझा एक्स कोण होता? ती प्रसिद्ध व्यक्ती होती का? त्या व्यक्तीला आम्ही ओळखतो का”, असा प्रश्न हे चार जण मिळून करणला विचारतात. हे ऐकताच करण म्हणतो, “हे देवा! माझ्याच शोमध्ये मला कधी इतकं तणावपूर्ण वातावरण जाणवलं नव्हतं. मला खरंच घाम फुटतोय.”

शोमध्ये आलेले हे खास पाहुणे अचानक डेविड धवन यांचं नाव घेतात. अभिनेता वरुण धवनचे वडील डेविड धवनला तू डेट केलंस का, असा प्रश्न ते करणला विचारतात. हा प्रश्न ऐकताच आधी करण आश्चर्यचकीत होोत आणि नंतर हसत म्हणतो, “मी कधीच डेविड धवनला डेट केलं नाही.”

कॉफी विथ करणचा बराच अनुभव असल्याने करण अनेक प्रश्नांची उत्तर चलाखीने आणि थेट नाव न घेता देण्यात यशस्वी ठरतो. या शोमध्ये पुन्हा एकदा आलिया भट्टची खिल्ली उडवली गेली. ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात ती ज्याप्रकारे रणबीर कपूरचं नाव शिवा असं घेते, त्यावरून पुन्हा एकदा तिची खिल्ली उडवली गेली.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI