AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तो तापाने फणफणत होता तरी..’, करण जोहरकडून सिद्धार्थ-कियारामधील भांडणाचा खुलासा

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघांचा लग्नसोहळा पार पडला. मात्र लग्नापूर्वी त्यांनी रिलेशनशिपविषयी कधीच खुलासा केला नव्हता. आता करण जोहरने त्यांच्यातील भांडणाचा खुलासा केला आहे.

'तो तापाने फणफणत होता तरी..', करण जोहरकडून सिद्धार्थ-कियारामधील भांडणाचा खुलासा
Sidharth Malhotra, Kiara AdvaniImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 22, 2023 | 7:39 PM
Share

मुंबई : 22 नोव्हेंबर 2023 | अभिनेत्री कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी एकमेकांशी लग्न करेपर्यंत रिलेशनशिपविषयी माध्यमांसमोर किंवा कोणत्याही शोमध्ये खुलासा केला नव्हता. मात्र ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता वरुण धवन हे त्या दोघांच्या लव्ह-स्टोरीबद्दल गप्पा मारू लागले होते. या गप्पांदरम्यानच करणने सिद्धार्थ आणि कियाराच्या भांडणाचा खुलासा केला. करणने एका पार्टीचं आयोजन केलं होतं आणि त्यावेळी सिद्धार्थ-कियारामध्ये जोरदार भांडण झालं होतं. मात्र भांडणानंतरही दोघं करणसाठी त्या पार्टीत उपस्थित होते. इतकंच नव्हे तर त्याच पार्टीत जेवताना दोघांनी भांडण मिटवलं होतं.

“मला अजूनही आठवतंय की त्यावेळी दोघांमध्ये भांडण झालं होतं. सिद्धार्थची तब्येत बरी नव्हती आणि त्याला तापसुद्धा आला होता. तरीसुद्धा तो माझ्या पार्टीला आला. त्या दोघांमध्ये ते सर्व खूप सुंदर होतं, कारण दोन तासांनंतर सिद्धार्थ आणि कियारा सोबत बसून जेवत होते. कियारा त्याला जेवण भरवत होती. त्याक्षणी मला हे जाणवलं की या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी खास आहे आणि ते कायम तसंच राहील”, असं करण सांगतो.

यावेळी वरुणनेही कियारा आणि सिद्धार्थचा एक किस्सा सांगितला. “आम्ही एका गाण्याचं शूटिंग करत होतो. शूटिंगनंतर आम्ही परतायला निघालो होतो. तेव्हा कियारा खूप खुश होती. सिद्धार्थ मला भेटायला येणार आहे आणि बिचाऱ्याला खूप ताप आहे, असं ती सांगत होती. तब्येत बरी नसतानाही तो एखाद्या मुलीला भेटायला आला म्हणजे काहीतरी नक्कीच आहे, असं मला वाटलं होतं”, असं वरुण म्हणतो.

सिद्धार्थ आणि कियाराने ‘शेरशाह’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातील गाणी लोकप्रिय ठरली. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात या दोघांनी लग्नगाठ बांधली. जैसलमेरमधील सूर्यगढ पॅलेसमध्ये सिद्धार्थ-कियाराचा लग्नसोहळा पार पडला.

कियारा लवकरच रामचरणसोबत ‘गेम चेंजर’मध्ये झळकणार आहे. त्याचसोबत ती हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआरसोबत ‘वॉर 2’मध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. तर सिद्धार्थ आगामी ‘योद्धा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय तो ‘इंडियन पोलीस फोर्स’ या सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वास पदार्पण करणार आहे. रोहित शेट्टीने या सीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. त्याच्यासोबत विवेक ओबेरॉय आणि शिल्पा शेट्टी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?
आघाडीसाठी अजित पवार आग्रही, मोठ्या पवारांचा विरोध?.
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?
चव्हाण अन् शिंदेंमधला वाद काही मिटेना? एकाच मंचावर पण दुरावा कायम?.