8 वर्षांनी लहान मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात अभिनेता; गुपचूप डेटिंग ॲपवर प्रोफाइल सुरू? लीक फोटोवर सोडलं मौन

हा अभिनेता त्याच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान मराठी अभिनेत्रीला डेट करतोय. गेल्या चार वर्षांपासून तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असताना आता एका डेटिंग ॲपवर त्याचा प्रोफाइल पहायला मिळाला. त्यावर नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलंय.

8 वर्षांनी लहान मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात अभिनेता; गुपचूप डेटिंग ॲपवर प्रोफाइल सुरू? लीक फोटोवर सोडलं मौन
मराठी अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचा डेटिंग ॲपवर प्रोफाइल लीक
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 21, 2025 | 10:10 AM

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणजे करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश. बिग बॉसच्या घरात हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांचं प्रेम फक्त बिग बॉसपुरतंच मर्यादित राहिलं नाही. घराबाहेर पडल्यानंतरही दोघं एकमेकांना डेट करू लागले आणि गेल्या चार वर्षांपासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत. हे दोघं लग्न करणार असल्याचीही जोरदार चर्चा आहे. अशातच एका प्रसिद्ध डेटिंग ॲपवर करणचा प्रोफाइल पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. तेजस्वीला डेट करत असताना करण असं करूच कसं शकतो, असा सवाल नेटकऱ्यांनी केला. या ट्रोलिंगवर आता खुद्द करणने प्रतिक्रिया दिली आहे.

‘बंबल’ नावाच्या डेटिंग ॲपवर करण कुंद्राचा प्रोफाइल पहायला मिळतोय. या प्रोफाइलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये करण कुंद्राचा फोटो आहे. त्याच्या नावासोबत वय 40 वर्षे असं लिहिलंय. करण कुंद्राचं आताचं वय 40 वर्षेच आहे. त्यामुळे हा प्रोफाइल तेजस्वीला डेट करण्याआधी बनवला गेलाय, अशीही शक्यता नसल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय.

करण कुंद्राची प्रतिक्रिया-

‘बंबल’ या डेटिंग ॲपवर माझं असं कोणतंच अकाऊंट नाही. टीकाकारांसाठी हा फक्त एक विषय आहे. हा तोच स्क्रीनशॉट नाही, जो याआधीही व्हायरल झाला होता. हा दुसरा स्क्रीनशॉट आहे. माझ्यासोबत असं बऱ्याचदा घडलंय. दर 6-8 महिन्यांतून अशा गोष्टी व्हायरल होत असतात. गेल्या तीन-चार वर्षांपासून हे घडतंय. माझे चाहतेसुद्धा मला हे पाठवतात. हा स्क्रीनशॉट गेल्या सहा-आठ महिन्यांपासून व्हायरल होत आहे. हा जुना फोटो आहे. ट्रोलर्सचं असंही म्हणणं आहे की माझी जागा या प्रोफाइलमध्ये सतत बदलत असते. हे खूप हास्यास्पद आहे. त्या प्रोफाइलवर मी कल्याणमध्ये राहतो, असं लिहिलंय. परंतु मी तर माझ्या कुटुंबीयांसोबत जलंधरमध्ये राहतोय,’ असं करणने स्पष्ट केलंय.

दरम्यान या व्हायरल फोटोवर अद्याप तेजस्वीने कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. नुकतंच या दोघांना अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती विकी जैनच्या वाढदिवसाच्या पार्टीत एकत्र पाहिलं गेलं होतं. गेल्या काही महिन्यांपासून हे दोघं लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही राहत असल्याची चर्चा आहे. करण कामानिमित्त मुंबईला आला तर वांद्रे इथल्या घरात दोघं एकत्र राहत असल्याचा खुलासा खुद्द तेजस्वीने एका मुलाखतीत केला होता.