मराठी अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडचा डेटिंग ॲपवरील प्रोफाइल लीक? चाहत्यांना बसला धक्का!
गेल्या चार वर्षांपासून हे दोघं एकमेकांना डेट करत आहेत. अशातच अभिनेत्याचं प्रोफाइल एका डेटिंग ॲपवर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये असतानाही डेटिंग ॲपवर त्याचं प्रोफाइल का आहे, असा सवाल त्यांनी केला आहे.

‘बिग बॉस’मधून घराघरात पोहोचलेली तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राची लोकप्रिय जोडी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत राहते. हे दोघं गेल्या चार वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. आपल्या रिलेशनशिपबद्दल ते नेहमीच माध्यमांसमोर मोकळेपणे व्यक्त झाले. तेजस्वी आणि करण यांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. परंतु अशातच करणचं एका डेटिंग ॲपवर प्रोफाइल पाहून चाहत्यांना धक्काच बसला आहे. ‘बंबल’ नावाच्या डेटिंग ॲपवर करण कुंद्राचा प्रोफाइल पहायला मिळतोय. या प्रोफाइलचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जर करण तेजस्वी प्रकाशला डेट करतोय, तर डेटिंग ॲपवर त्याचा प्रोफाइल का आहे, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
या व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये करण कुंद्राचा फोटो पहायला मिळतोय. त्याच्या नावासोबत वय 40 वर्षे असं लिहिलंय. करण कुंद्राचं आताचं वय 40 वर्षेच आहे. त्यामुळे हा प्रोफाइल तेजस्वीला डेट करण्याआधी बनवला गेलाय, अशीही शक्यता नाही. विशेष म्हणजे करण हा एकेकाळी ‘बंबल’ या डेटिंग ॲपचा ब्रँड ॲम्बेसेडर होता. परंतु त्यावेळी तो अभिनेत्री अनुषा दांडेकरला डेट करत होता. त्यामुळे चाहते असाही अंदाज लावत आहे की या डेटिंग ॲपवरील करणचा प्रोफाइल हा ब्रँडच्या कॅम्पेनचा एक भाग असू शकतो.

करण कुंद्राच्या प्रोफाइलचा स्क्रीनशॉट ‘रेडिट’वरही व्हायरल होत आहे. त्यावर एकाने लिहिलं, ‘मी बंबलवर व्हेरिफाइड टॅगवाले बोगस अकाऊंटसुद्धा पाहिले आहेत. यातून काहीच सिद्ध होत नाही. एखादा सेलिब्रिटी रिलेशनशिपमध्ये असताना इतक्या लोकप्रिय डेटिंग ॲपवर अकाऊंट उघडणार नाही.’ तर दुसऱ्या युजरने म्हटलंय, ‘हा बोगस प्रोफाइल असू शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही. कोणी इतका मूर्ख नसतो, ती जाहिररित्या रिलेशनशिपमध्ये असताना डेटिंग ॲपवर खुल्लमखुल्ला अकाऊंट उघडेल. हा त्याचा जुना प्रोफाइलसुद्धा असू शकतो.’
View this post on Instagram
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे ‘बिग बॉस 15’मध्ये एकमेकांच्या जवळ आले. हा शो संपल्यानंतरही दोघांना अनेकदा एकमेकांसोबत पाहिलं गेलं. इतकंच नव्हे तर करण आणि तेजस्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचीही चर्चा आहे. यासाठी खुद्द आईवडिलांनीच परवानगी दिल्याचा खुलासा तेजस्वीने एका मुलाखतीत केला होता.
