
Nisha Rawal on Video with Son: टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री निशा रावल तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे कमी पण खासगी आयुष्यामुळे कायम चर्चेत अता. 2021 मध्ये पती आणि अभिनेता करण मेहरा याच्यासोबत घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर निशा सिंगल मदर म्हणून मुलाचा सांभाळ करत आहे. करण आणि निशा यांच्या मुलाचं नाव काविश असं आहे. अभिनेत्री कायम मुलासोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. दरम्यान, एका कार्यक्रमात निशा मुलासोबत आली होती.
कार्यक्रमातील दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांनी निशावर निशाणा साधला. अशात व्हिडीओ पाहिल्यानंतर ट्रोल करणाऱ्यांना निशाने सडेतोड उत्तर दिलं आहे. सध्या सर्वत्र निशा हिची चर्चा सुरु आहे.
इन्स्टेन्ट बॉलिवूडला दिलेल्या मुलाखतीत निशा रावल म्हणाली, ‘त्यावर मला काहीही बोलायचं नाही. फक्त एवढचं बोलेल की, लाज वाटली पाहिजे त्या लोकांनी जे एका आई आणि मुलाच्या नात्याला अशा दृष्टीने पाहतात… वाईट विचार त्यांच्या मनात आहेत. मी त्यावर जास्त काहीही बोलणार नाही…’ असं देखील निशा म्हणाली.
निशा रावल हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, खासगी आयुष्यामुळे निशा तुफान चर्चेत आली. करण याच्यावर अभिनेत्रीने घरगुती हिंसाचाराचे देखील आरोप केला. शिवाय करण सतत मारहाण करत असल्याचं देखील तिने सांगितलं होतं. दोघांमध्ये वाद सुरु असताना अनेक फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
निशा आणि करण यांचे वाद इतके टोकाला पोहोचले की नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलं. मुलाच्या जन्मानंतर देखील दोघांमधील वाद मिटले नाही. अखेर दोघांनी देखील घटस्फोटाचा निर्णय घेतला. निशा रावल हिने 2017 मध्ये मुलाला जन्म दिला. करण मेहरा याला घटस्फोट दिल्यानंतर कोर्टाने मुलाची कस्टडी निशा हिला दिली आहे.
घटस्फोटानंतर निशा मुलासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. सोशल मीडियावर देखील निशा कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.