AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अशी ही बनवाबनवी’ फेम शंतनूच्या आठवणीत बायकोनं केलं टक्कल; म्हणाली ‘मी स्वत:ला मुक्त..’

Bollywood Actress bald look: नवऱ्याच्या निधनानंतर अभिनेत्रीचा लक्षवेधी लूक, दिवंगत पतीचा ब्लेझर आणि टक्कल, अभिनेत्री म्हणते, 'आपण स्वतःला पिंजऱ्यात बंद करतो पण...', सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोशूटची चर्चा...

'अशी ही बनवाबनवी' फेम शंतनूच्या आठवणीत बायकोनं केलं टक्कल; म्हणाली 'मी स्वत:ला मुक्त..'
| Updated on: Apr 15, 2025 | 7:40 AM
Share

Bollywood Actress bald look: 90 च्या दशकात आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शांती प्रिया तुम्हाला आठवत असेलच. अभिनेत्रीने अक्षय कुमार याच्यासोबत ‘सौगंध’ तर, अभिनेता सनी देओल याच्यासोबत ‘वीरता’ आणि अन्य अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावली. आता शांती प्रिया मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अशात शांती प्रिया हिने दिवंगत नवऱ्याच्या ब्लेझरमध्ये फोटोशूट केलं आहे. नवऱ्याच्या निधनानंतर अभिनेत्रीचा लक्षवेधी लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

टक्कल करून अभिनेत्री नवऱ्याच्या ब्लेझरमध्ये फोटोशूट केलं आहे. शांती प्रिया ही ‘अशी ही बनवाबनवी’ सिनेमात शंतनू ही भूमिका साकारणारा दिवंगत अभिनेता सिद्धार्थ रे याची पत्नी आहे.  अनेकांना शांती प्रिया हिचा लूक आवडलेला आहे. तर अनेकांनी मात्र अभिनेत्रीला ट्रोल केलं आहे. काही दिवसांपूर्वी शांती प्रिया हिने टक्कल आणि नव्या नवरीच्या लूकमध्ये फोटोशूट केलं होतं.

आता देखील अभिनेत्रीने हटके लूक करत चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्री कॅप्शनमध्ये म्हणते, ‘नुकताच मी टक्कल केलं आहे. महिला असल्यामुळे आपण आपल्या भोवती मर्यादा ठरवतो. नियमांचं पालन करतो आणि स्वतःला एका पिंजऱ्यात बंद करतो. पण या बदलासह मी स्वतःला मुक्त केलं आहे.’ सध्या अभिनेत्रीने पोस्टसाठी लिहिलेलं कॅप्शन देखील चर्चेत आहे.

शांती प्रिया हिने मेकअपसह तिच्या टक्कल लूकला एक उत्कृष्ट टच दिला. तिने गुलाबी ओठ, तपकिरी आयशॅडो, आयलायनर, मस्कारा आणि ब्लश लावून तिचे सौंदर्य वाढवलं आहे. हटके लूक करून अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आणि आता लोक सोशल मीडियावर तिच्याबद्दल चर्चा करत आहेत.

अनेकांना अभिनेत्री नवा लूक आवडला आहे. तर अनेकांनी टीका केली आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘हे काय केलस… लांब केस म्हणजे दाक्षिणात्य महिलांचं सौंदर्य आहे…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘सॉरी… पण तू नव्हतं करायला पाहिजे…’, ‘आता टकली म्हणालो की बॉडी शेमिंगचा आरोप करेल…’ असं देखील अभिनेत्रीला नेटकरी म्हणत आहेत.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा