बॉलिवूडमध्ये जी घाण आहे ती…, ‘पुष्पा’ फेम सेलिब्रिटीचं लक्षवेधी वक्तव्य, पण असं का म्हणाला?
'पुष्पा' सिनेमातील प्रसिद्ध सेलिब्रिटीचं बॉलिवूडबद्दल लक्षवेधी वक्तव्य, 'बॉलिवूडमध्ये जी घाण आहे ती...', बॉलिवूडबद्दल अनेक नको त्या गोष्टी समोर येत असतात. अता देखील प्रसिद्ध सेलिब्रिटी बॉलिवूड विरोधात मोठं वक्तव्य केलं आहे.

बॉलिवूडमध्ये जी घाण आहे ती साफ केली पाहिजे… असं वक्तव्य दुसरं तिसरं कोणी नाही तर, बॉलिवूडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय कोरियोग्राफर गणेश आचार्य याने केलं आहे. सांगायचं झालं तर, दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन फेम ‘पुष्पा’ आणि ‘पुष्पा 2’ ने बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी केली. सिनेमातील गाण्यांना देखील चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. ‘पुष्पा’ सिनेमातील ‘ऊ अंतावा’ हे गाणं तर आजही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. गाणं अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्यावर चित्रित करण्यात आलं. तर कोरियोग्राफर गणेश आचार्य यांनी केलं आहे.
कोरियोग्राफर गणेश आचार्य याने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, साऊथ सिनेविश्वात देखील स्वतःची ओळख भक्कम केली आहे. गणेश याने दाक्षिणात्य सिनेविश्वातील हायबजेट सिनेमे ‘पुष्पा’: द राइज, केजीएफ, देवरा, गेम चेंजर’ आणि ‘पुष्पा’: द रूल’ मधील गाण्यासाठी काम केलं आहे.
बॉलिवूड आणि साऊथ सिनेविश्वात काम केल्यानंतर गणेश याने दोन्ही सिनेविश्वात काय अंतर आहे. यावर मोठं वक्तव्य केलं आहे. ‘पुष्पा’ सिनेमातील गाण्यांचं काम पूर्ण झाल्यानंतर गणेश स्वतःच्या घरी परतला. तेव्हा खुद्द अल्लू अर्जुन याने गणेश याला फोन केला आणि काम अतिशय चांगलं झालं… असं म्हणत गणेश आचार्य याचं आणि त्याच्या कामाचं कौतुक केलं.
View this post on Instagram
गणेश म्हणाला, ‘अल्लू अर्जुन शिवाय मला आजपर्यंत कोणत्याच स्टार फोन करुन माझं आणि माझ्या कामाचं कौतुक केलं नाही. अल्लूने मला पूष्पाच्या सक्सेस पार्टीसाठी देखील बोलावलं होतं. सक्सेस पार्टी आहे त्यामुळे मला असं वाटलं की खाणं – पिणं असेल…’
‘पण पार्टीतील चित्र फार वेगळं होतं. पार्टीत सिनेमाचे कॅमेरामॅन, लाईटमॅन सर्वांना पुरस्कार दिले जात होते. हे चित्र मी बॉलिवूडमध्ये कधीच पाहिलं नाही. याठिकाणी मी आज बॉलिवूडबद्दल काही वाईट सांगत नाही. पण बॉलिवूडमध्ये जी घाण आहे ती साफ केली पाहिजे…’ असं देखील कोरियोग्राफर गणेश आचार्य म्हणाला.
