AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Saif Ali Khan-Kareena Kapoor : तर माझे किती पैसे वाचले असते!’ करीनाने सांगितली लव्ह स्टोरी, सैफच्या उत्तराने कपिल शर्माही हसला

Kareena And Saif : कपिल शर्मा याच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' च्या नव्या भागात करीना कपूर आणि सैफ अली खान एकत्र आले होते. दोघांनी त्यांच्या लव्ह लाईफबद्दल मजेशीर खुलासे केले.

Saif Ali Khan-Kareena Kapoor : तर माझे किती पैसे वाचले असते!’ करीनाने सांगितली लव्ह स्टोरी, सैफच्या उत्तराने कपिल शर्माही हसला
| Updated on: Oct 17, 2026 | 4:57 PM
Share

Kareena And Saif : करीना कपूर आणि सैफ अली खान हे दोघे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांच्या लग्नाला 14 वर्ष झाली असून, आजही चाहत्यांना या दोघांमधील मजेशीर संवाद आणि केमिस्ट्री आवडते. नुकतेच त्या दोघांनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये हजेरी लावली. या पॉवर कपलने त्यांची पर्सनल लाइफ आणि लव्ह स्टोरीशी निगडीत अनेक मजेदार खुलासे देखील केले. याच शोमध्ये करीनाने सांगितलं की सैफ अली खानने तिला लग्नासाठी एकदा नव्हे तर तब्बल 3 वेळा प्रपोज केलं होतं.

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चा नवा प्रोमो नुकताच जारी करण्यात आला. त्यामध्ये करीना-सैफची छान केमिस्ट्री पहायला मिळाली. याचवेळी करीनाने सांगितलं की, ‘ सैफने पहिल्यांदा प्रपोज केलं ते मुंबईत, दुसऱ्यांचदा ग्रीसमध्ये आणि तिसऱ्यांदा पॅरिसमध्ये लग्नासाठी विचारलं. त्यानंतर अखेर करीनाने त्याला लग्नासाठी होकार दिला.’

सैफची मजेदार रिॲक्शन

मात्र करीनाचा हा खुलासा ऐकताच सैफने अतिशय मजेशीर अंदाजात, हजरजबाबीपणे उत्तर दिलं. करीनाच्या बोलण्यावर मजेमजेत चिमकचा काढत सैप म्हणाला, ” जर पहिल्या वेळीच तू हो म्हणाली असतीस, तर माझे किती पैसे वाचले असते !” त्याचं हे मजेशीर उत्तर ऐकून होस्ट कपिल शर्मा आणि तिथे उपस्थित सर्वांनाच हसू अनावर झालं.

कपिल च्या शोमध्ये शानदार मैफिल

कपिल शर्माच्या शोमध्ये सैफ- करीनाने त्यांचा 14 वर्षांच्या लग्नाचा अनुभव, घरातील सवयी आणि एकमेकांशी निगडीत मजेशीर किस्से सांगितले. या एपिसोडबद्दल दोघांचे चाहते चांगलेच उत्सुक आहेत.

‘टशन’ चित्रपटाचं शूटिंग करत असताना सैफ-करीना एकमेकांच्या जवळ आले. ते आधीपासूनच एकमेकांना ओळखत होते, मात्र याच फिल्मच्या सेटवर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्या दोघांनी काही वर्ष एकमेकांना डेट केलं, लिव्ह-इनमध्ये राहिले आणि अखेर 16 ऑक्टोबर 2012 साली त्यांनी लग्न केलं. त्यांना तैमूर आणि जेह अली खान अशी दोन मुलं आहेत.बॉ

Follow Us
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...