AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करीना कपूरचा ‘या’ सेलिब्रिटींसोबत ३६ चा आकडा, एकीला म्हणाली ‘काळी मांजर…’

Kareena Kapoor: 'या' सेलिब्रिटींचं तोंड देखील पाहत नाही करीना कपूर, गेल्या अनेक वर्षांपासून ३६ चा आकडा, प्रसिद्ध अभिनेत्रीला सर्वांसमोर म्हणाली, 'काळी मांजर...', करीना कायम असते कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत

करीना कपूरचा 'या' सेलिब्रिटींसोबत ३६ चा आकडा, एकीला म्हणाली 'काळी मांजर...'
| Updated on: Nov 15, 2024 | 9:59 AM
Share

Kareena Kapoor: बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री करीना कपूर हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. गेल्या अनेक वर्षांपासून बेबो मोठ्या पडद्यावर राज्य करत आहे. पण बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अनेक सेलिब्रिटींसोबत करीनाचे वाद देखील झाले. झगमगत्या विश्वात असे 5 सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्यासोबत करीनाचा ३६ चा आकडा आहे. काही अभिनेते आणि अभिनेत्री देखील करीनाचे शत्रू आहेत. यामध्ये एक अभिनेत्री अशी देखील आहे, तिला करीना काळी मांजर म्हणाली होती… त्या सेलिब्रिटींबद्दल आज जाणून घेऊ…

अभिनेता बॉबी देओल – गेल्या अनेक वर्षांपासून बॉबी देओल आणि करीना कपूर यांच्यामध्ये वाद आहेत. ‘जब वी मेट’ सिनेमाची ऑफर बॉबीला होती. पण करीनासोबत वाद असल्यामुळे अभिनेत्याला संधी मिळाली नाही. त्यानंतर एकदाही बॉबी – करीना एकत्र दिसले नाहीत. दोघांमधील वाद देखील अनेकदा समोर आले.

अभिनेत्री अमिषा पटेलअमिषा पटेल हिच्यासोबत देखील करीनाचा ३६ चा आकडा आहे. करीनाचा ‘रिफ्यूजी’ आणि अमिषाचा ‘कहो ना प्यार है’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. तेव्हा करीनाचा ‘रिफ्यूजी’ फ्लॉप ठरला आणि अमिषाच्या ‘कहो ना प्यार है’ सिनेमाने चाहत्यांना डोक्यावर घेतलं. तेव्हा अमिषा वाईट अभिनेत्री आहे… असं बेबो म्हणाली होती. त्यानंतर दोघींमध्ये वाद सुरु झाले.

अभिनेता जॉन अब्राहम : करण जोहरच्या चॅट शोमध्ये करीना कपूरने जॉनला एक्सप्रेशनलेस अभिनेता म्हटलं होतं. शिवाय जॉनसोबत कधीही काम करणार नसल्याचं बेबो म्हणाली. करिनाच्या या कमेंटमुळे जॉनही चांगलाच संतापला होता. यानंतर दोघांनी पुन्हा कधीही एकत्र काम न करण्याची शपथ घेतली. त्यानंतर आजतागायत हे दोघेही एकाही सिनेमात एकत्र दिसले नाहीत.

अभिनेता शाहिद कपूर : करीना आणि शाहिद रिलेशनशिपमध्ये होते. दोघांची जोडी देखील चाहत्यांना प्रचंड आवडायची. पण काही कारणांमुळे दोघांचं ब्रेकअप झालं. त्यानंतर करीना – शाहिद कधीच एकत्र दिसले नाही. ‘उडता पंजाब’ सिनेमात दोघे दिसले पण दोघांचा एकही सीन एकत्र नव्हता.

अभिनेत्री बिपाशा बासू : ‘अजनबी’ सिनेमात दोघींनी एकत्र स्क्रिन शेअर केली होती. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांमध्ये वाद झाले. तेव्हा करीना, बिपाशा हिला काळी मांजर म्हणाली होती. तेव्हापासून दोघींमध्ये वाद आहेत. कोणत्या कार्यक्रमात देखील दोघी एकत्र दिसत नाहीत.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा