AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor: करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओनंतर अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया समोर

Kareena Kapoor: अभिनेत्री करीना कपूरचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. या चर्चांवर आता तिने स्वत:च मजेशीर अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे. पहा तिची पोस्ट..

Kareena Kapoor: करीना कपूर तिसऱ्यांदा आई होणार? व्हायरल व्हिडीओनंतर अभिनेत्रीची पहिली प्रतिक्रिया समोर
Kareena KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 23, 2026 | 6:38 AM
Share

अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या प्रेग्नंसीच्या चर्चांमुळे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. मुंबईतील जिमबाहेरचा तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी ती तिसऱ्यांदा आई होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. या व्हिडीओमध्ये करीना जिमच्या कपड्यांमध्ये दिसत असून तिच्या टीममधील एका व्यक्तीने छत्रीच्या मदतीने तिला कॅमेऱ्यांपासून झाकण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिच्या लूकवरून आणि पोटाचा घे पाहून प्रेग्नंसीच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांवर आता अभिनेत्रीने अप्रत्यक्षपणे प्रतिक्रिया दिली आहे. आता स्वत: करीनाने या चर्चांवर थेट प्रतिक्रिया न देता आपल्या खास अंदाजात उत्तर दिलं आहे.

सेलिब्रिटी हेअर आणि मेकअप आर्टिस्ट मितेश राजानी यांनी एक मजेशीर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी पोट धरून आरशासमोर फोटो काढला होता आणि त्यासोबत ‘हम आपके हैं कौन’ या चित्रपटातील ‘चॉकलेट, लाइम ज्यूस’ या गाण्याचा संदर्भ दिला होता. करीनाने ही स्टोरी तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. विशेष म्हणजे करीनाने या पोस्टसोबत हसणारा इमोजी, चेहरा झाकलेला माकडाचा इमोजी आणि पिझ्झाचे इमोजी वापरले आहेत. त्यामुळे तिची ही पोस्ट प्रेग्नंसीच्या अफवांवर मजेशीर टोला असल्याचं मानलं जात आहे. इतकंच नव्हे तर पिझ्झाचा इमोजी पाहून काही चाहत्यांनी असाही अंदाज लावला आहे की, जिममध्ये जाण्यापूर्वी तिने पिझ्झा खाल्ल्यामुळे पोट थोडं फुगलेलं दिसलं असावं.

करीना कपूरची पोस्ट-

या संपूर्ण प्रकरणात करीनाची प्रतिक्रिया विशेष चर्चेत आली आहे. प्रेग्नंसीसारख्या वैयक्तिक विषयावर थेट स्पष्टीकरण देण्याऐवजी तिने विनोदी पद्धतीने प्रतिक्रिया देणं पसंत केलं. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्येही या पोस्टची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या प्रत्येक लूक आणि फिटनेसवरून वेगवेगळे अंदाज बांधले जातात. करीनाच्या बाबतीतही असंच काहीसं झाल्याचं पहायला मिळालं.

करीनाच्या तिसऱ्या प्रेग्नंसीच्या चर्चांवर तिच्या कुटुंबातून प्रतिक्रिया समोर आली आहे. तिची नणंद आणि सैफ अली खानची बहीण सबा पटौदीने हा केवळ ‘चुकीचा कॅमेरा अँगल’ असल्याचं म्हटलं आहे. तसंच लोकांनी लगेच निष्कर्ष काढू नयेत, असंही तिने सांगितलं आहे. सबा पटौदीने चाहत्यांना ‘जगा आणि जगू द्या’, असा संदेशही दिला आहे. करीना आणि सैफ अली खान यांना तैमूर आणि जहांगीर ही दोन मुलं आहेत.

Follow Us
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित
राहुल गांधींकडून पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित; मोदींवर दुहेरी भूमिकेचा आरोप
छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
नवनाथ बन यांचा दावा, छात्रों की गूंज कार्यक्रमात प्रत्येकी ३५ हजार रुपये वाटप
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
चित्रा वाघ यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल:
कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी साकारली राहुल गांधींची सुंदर रांगोळी
राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याला उस्फुर्त प्रतिसाद! कार्यकर्ता तसेच विद्यार्थिनींनी सकारली सुंदर रांगोळी
पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुणांकडून खास भेट...
कार्यकर्त्यांचा उत्साह! पुण्यात राहुल गांधींना मुस्लिम तरुण देणार छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाब
पुण्यात राहुल गांधींची पदाधिकाऱ्यांसोबत बैठक; महाराष्ट्रातील राजकारणाबाबत चर्चा, अगामी काळात...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची...
राहुल गांधींचं पुण्यात पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, कार्यक्रमाची जय्यत तयारी
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट
सणासुदीपूर्वी चंद्रपूरमध्ये साखरेचे भाव गगनाला, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या...
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप: राहुल गांधींच्या प्रचारासाठी इन्फ्लुएंसर्सना तब्बल...
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान;
Abdul Sattar: मराठा आरक्षणावर अब्दुल सत्तारांचे मोठे विधान; जरांगेंना चर्चेतून न्याय देणार