AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : करीना कपूर खान हिची पतौडी पॅलेसमध्ये धमाल, अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल

करीना कपूर खान ही कायमच चर्चेत असते. करीना कपूर खान हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. करीना कपूर खान ही सोशल मीडियावर देखील सक्रिय असते. नुकताच करीना कपूर खान हिचा वाढदिवस खास प्रकारे साजरा करण्यात आला.

Video : करीना कपूर खान हिची पतौडी पॅलेसमध्ये धमाल, अभिनेत्रीचा 'तो' व्हिडीओ तूफान व्हायरल
| Updated on: Sep 24, 2023 | 10:28 AM
Share

मुंबई : करीना कपूर खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) हिचा काही दिवसांपूर्वीच लाल सिंह चढ्डा हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना करीना कपूर खान ही दिसली. या चित्रपटात करीना कपूर खान हिच्यासोबत आमिर खान (Aamir Khan) हा देखील मुख्य भूमिकेत दिसला. हा चित्रपट बिग बजेटचा चित्रपट ठरला. मात्र, लाल सिंह चढ्डा या चित्रपटाला धमाका करण्यात यश मिळाले नाही. सोशल मीडियावर चित्रपटाच्या विरोधात वातावरण बघायला मिळाले.

लाल सिंह चढ्डा या चित्रपटाच्या विरोधात सोशल मीडियावर मोठा संताप हा बघायला मिळाला. याचाच मोठा फटका लाल सिंह चढ्डा या चित्रपटाला बसला. परिणामी लाल सिंह चढ्डा हा चित्रपट फ्लाॅप गेला. लाल सिंह चढ्डा चित्रपट फ्लाॅप गेल्यापासून आमिर खान हा मोठ्या पडद्यापासून दूर आहे. लाल सिंह चढ्डा चित्रपटाकडून त्याला मोठ्या अपेक्षा होत्या.

नुकताच करीना कपूर खान हिने आपला वाढदिवस अत्यंत खास प्रकारे पतौडी पॅलेसमध्ये साजरा केला. यावेळी खास मोठ्या पार्टीचे आयोजनही करण्यात आले. करीना कपूर खान हिच्या अत्यंत जवळच्या लोकांना या पार्टीचे आमंत्रण होते. आता या पार्टीतील काही व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये पतौडी पॅलेसमध्ये करीना कपूर खान ही धमाल करताना दिसत आहे.

करीना कपूर खान व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये मॅजिक कार्ड्स खेळताना दिसतंय. यावेळी करीना कपूर खान हिच्यासोबत सैफ अली खान हा देखील दिसतोय. जेह देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मॅजिक कार्ड्स खेळत असताना आपल्या हातामधीस कार्ड्स गायब झाल्याने करीना कपूर हैराण झाल्याचे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय.

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये करीना कपूर खान हिचा जबरदस्त असा लूक दिसतोय. पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये या व्हिडीओत करीना कपूर खान ही दिसतंय. या व्हिडीओवरून हे समजते की, करीना कपूर खान हिचा वाढदिवस किती जास्त खास प्रकारे साजरा करण्यात आला. करीना कपूर खान हिला सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते हे मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देताना दिसले.

करीना कपूर खान ही नेहमीच आपल्या कुटुंबासोबत खास वेळ घालवताना दिसते. काही दिवसांपूर्वीच करीना कपूर खान आणि सैफ अली खान हे आपल्या दोन्ही मुलांना घेऊन विदेशात फिरण्यासाठी गेले. यावेळीचे काही खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना करीना कपूर खान ही दिसली. करीना कपूर खान ही सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Follow Us
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक