Pataudi Palace | ‘हॉटेल’चा करार रद्द, ‘पतौडी पॅलेस’मध्ये नवाब सैफ अली खान कुटुंबासोबत राहणार!

10 एकर परिसरात विसावलेल्या या पतौडी पॅलेसमध्ये 150 खोल्या असून, सात मोठ्या बेडरूम आहेत.

Pataudi Palace | ‘हॉटेल’चा करार रद्द, ‘पतौडी पॅलेस’मध्ये नवाब सैफ अली खान कुटुंबासोबत राहणार!
Follow us
| Updated on: Oct 22, 2020 | 4:53 PM

मुंबई : बॉलिवूडचा नवाब अर्थात अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) त्याच्या लॅविश जीवनशैलीमुळे संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहे. सैफ अली खानची स्टाईल प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच एक वेगळी छाप पाडत असते. सैफ कायम त्याच्या चाहत्यांशी आणि माध्यमांशी संवाद साधत असतो. अलीकडेच सैफने पतौडी पॅलेसमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत ‘क्वॉलिटी टाईम’ घालवला होता. त्यानंतर काहीच दिवसांपूर्वी कुटुंबासमवेत तो मुंबईला परतला आहे. त्याने पतौडी पॅलेसचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु, आता सैफ आपल्या कुटुंबासोबत तिथे राहायला जाणार असल्याचे कळते आहे. (Saif Ali Khan wants to shift to Pataudi Palace with family)

सैफसोबत करिना आणि तैमूरदेखील या पतौडी पॅलेसमध्ये शिफ्ट होणार असल्याचे कळते आहे. यावर खुद्द सैफने प्रतिक्रिया दिली आहे. एका वृत्तवाहिनीच्या या प्रश्नाला आपले उत्तर देताना सैफ अली खान म्हणाला की, ‘पतौडी पॅलेसमध्ये राहायला जाणं ही कल्पना छान आहे.’ पुढे तो म्हणाला की, असे केल्याने खरंच खूप मजा येईल. म्हणजे इथे जलतरण तलाव असल्याने आम्हाला वाटेल तेव्हा पोहू शकू, छान जेवण बनवू शकू, पुस्तके वाचायला वेळ मिळेल, याशिवाय संपूर्ण कुटुंबाला एकत्र राहता येईल. परंतु, या पॅलेसजवळ सध्या चांगल्या शाळांची गरज असल्याचेही सैफ म्हणाला.

View this post on Instagram

Tim & Abba ? #dadandson #favorites #kareenakapoorkhan #saifalikhan #taimuralikhan

A post shared by Saif Ali Khan (@actorsaifalikhan) on

‘हॉटेल’करार रद्द!

सैफ अली खानच्या कुटुंबाने या पॅलेसला एका हॉटेलसमूहाला भाडेतत्वावर वापरण्यासाठी दिला होता. मात्र, आता त्यांनी हा करार रद्द करून ‘पतौडी पॅलेस’ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आहे. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या खूप आठवणी या पॅलेसशी जोडल्या आहेत, असे सैफ म्हणाला. हा पॅलेस आमच्यासाठी खूप अनमोल असून, याची कोणीही किंमत ठरवू शकत नाही, त्यामुळे आत तो कायम आमच्या जवळच राहील, असे तो म्हणाला.( Saif Ali Khan wants to shift to Pataudi Palace with family)

पॅलेस विकल्याची अफवा

मध्यंतरीच्या काळात सैफच्या कुटुंबाने हा पॅलेस विकल्याच्या चर्चा सुरू होत्या. इतकेच नव्हे तर, तो पुन्हा मिळवण्यासाठी त्यांना 800 करोड रुपयांची गरज असल्याचे देखील म्हटले गेले होते. यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागल्याची देखील चर्चा होते. मात्र, सैफ अली खानने या सगळ्या गोष्टींचा दावा फेटाळत, पतौडी पॅलेस आमचाच असून, आम्हाला तो विकत घेण्याची काय गरज?, असे म्हणत या चर्चांना पूर्णविराम दिला होता. फक्त काही अधिकृत कागदपत्रांची जमवाजमव सुरू होती, असे त्याने म्हटले. 10 एकर परिसरात विसावलेल्या या पॅलेसमध्ये 150 खोल्या असून, सात मोठ्या बेडरूम आहेत. याशिवाय राजवाड्यात असणाऱ्या सगळ्या सुख-सुविधा या पॅलेसमध्ये आहेत.

(Saif Ali Khan wants to shift to Pataudi Palace with family)

संबंधित बातम्या : 

पद्मश्री पुरस्कार सरकारला परत करण्याची इच्छा : सैफ अली खान

तैमुर दादा होणार!, ‘सैफिना’कडून गुड न्यूज

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.