AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor | ‘करीनाचा असा इगो काय कामाचा?’ मराठी अभिनेत्रीसोबतच्या वागणुकीचा दिग्दर्शकांनी केला खुलासा

या पोस्टमध्ये त्यांनी राधिक आपटेचाही किस्सा सांगितला आहे. 'मागे एका इंटरव्ह्यूमध्ये हिंदीत काम करणारी मराठी अभिनेत्री राधिका आपटे हिने तिला लोकांना फोटो, सेल्फी द्यायला आवडत नाही, ती सही पण देत नाही चाहत्यांना असं सांगत होती.'

Kareena Kapoor | 'करीनाचा असा इगो काय कामाचा?' मराठी अभिनेत्रीसोबतच्या वागणुकीचा दिग्दर्शकांनी केला खुलासा
Kareena KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: May 07, 2023 | 10:22 AM
Share

मुंबई : अभिनेत्री करीना कपूर अनेकदा तिच्या वागणुकीमुळे सोशल मीडियावर चर्चेत येते. आता पुन्हा एकदा करीनाला तिच्या वागणुकीमुळे ट्रोल करण्यात येतंय. मराठी दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी करीनाशी संबंधित एक किस्सा सांगितला. याविषयी त्यांनी इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. करीनाने एका मराठी कलाकाराला कशी वागणूक दिली, याविषयी त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं आहे. इन्फोसिसचे नारायण मूर्ती आणि करीना कपूर हे एकाच विमानातू प्रवास करत होते. नारायण मूर्तींनी सांगितलेल्या प्रसंगाचा उल्लेख करत टिळेकर यांनी करीनावर टीका केली.

महेश टिळेकर यांची पोस्ट-

‘कुठं मूर्ती आणि कुठे करीना? नुकताच इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या इंटरव्ह्यूचा एक व्हिडिओ पाहिला. ज्यात ते सांगत होते की लंडनहून ते भारतात येत असताना फ्लाइटमध्ये त्यांच्या पुढच्या सीटवर करीना कपूर बसली होती. फ्लाइटमधील काही लोक नारायण मूर्ती यांच्याजवळ येऊन त्यांना अभिवादन करत होते, दोन शब्द बोलत होते आणि लोक आपल्याला रिस्पेक्ट देतायेत म्हणून मूर्ती उभे राहून त्यांच्याशी संवाद साधत होते. पण काही चाहते करीना कपूरजवळ जाऊन तिला हॅलो म्हणत होते. तर ही त्यांच्याकडे ढुंकूनही पाहत नव्हती आणि ही गोष्ट नारायण मूर्ती यांना खूप खटकल्याचे त्यांनी सांगितले आणि करीनाचा असा इगो काय कामाचा? असा प्रश्नही त्यांनी केला.’

‘8 वर्षांपूर्वी आमचा मराठी तारका कार्यक्रमाचा परदेशातून शो करून एअरपोर्टवर आल्यावर पुन्हा तिथे चेकिंगसाठी असणाऱ्या रांगेत मी उभा होतो. तर आमच्या कार्यक्रमातील एका मराठी अभिनेत्रीच्या पुढे करीना कपूर उभी होती. तिचा पासपोर्ट दाखवून ती पुढे वळताना तिचा चेहरा दिसला तसा आपली मराठी अभिनेत्री तिच्याशी बोलायला म्हणून लाळ घोटेपणा करत तिच्यामागे धावत गेली. पण करीना तिला फाट्यावर मारत झपाझप पावले टाकत पुढे निघून गेली. बरं याच मराठी अभिनेत्रीने करीना कपूर च्या एका लोकप्रिय सिनेमात एका सीनसाठी नगण्य भूमिका केली होती. तरीदेखील करीनाने तिच्याकडे मान वळवून ही पाहिलं नाही, फोटो काढणं तर दूरच. पण हेच स्वतः च्या प्रेमात असणारे काही सेलिब्रिटी यांचा एखादा सिनेमा रिलीज व्हायचा असेल तेव्हा जनमानसात मिसळून, चाहत्यांबद्दल प्रेम असल्याचा जो अभिनय करतात त्याला खरंच तोड नाही,’ असं त्यांनी लिहिलं.

या पोस्टमध्ये त्यांनी राधिक आपटेचाही किस्सा सांगितला आहे. ‘मागे एका इंटरव्ह्यूमध्ये हिंदीत काम करणारी मराठी अभिनेत्री राधिका आपटे हिने तिला लोकांना फोटो, सेल्फी द्यायला आवडत नाही, ती सही पण देत नाही चाहत्यांना असं सांगत होती. पण काहीच दिवसांपूर्वी OTT वर रिलीज झालेल्या तिच्या एका हिंदी सिनेमाच्या प्रमोशननिमित्ताने मात्र सोशल मीडियावर पॉप्युलर असणाऱ्या काही इन्फ्लुएन्सर बरोबर सेल्फी देऊन स्वतः ची प्रसिद्धी करून घेत होती,’ असं त्यांनी लिहिलं आहे.

Follow Us
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?