AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kareena Kapoor | आईच्या विरोधात जात शाहिद कपूर याच्यासाठी करीना कपूर हिने उचलले होते ‘हे’ पाऊल, अत्यंत मोठा खुलासा

शाहिद कपूर आणि बाॅलिवूड अभिनेत्री करीना कपूर हे दोघे अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. विशेष म्हणजे यांच्या जोडीला प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळताना देखील दिसले. मात्र, अचानक यांच्यामध्ये ब्रेकअप झाले. शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या ब्रेकअपनंतर चाहत्यांना देखील मोठा झटका बसला.

Kareena Kapoor | आईच्या विरोधात जात शाहिद कपूर याच्यासाठी करीना कपूर हिने उचलले होते 'हे' पाऊल, अत्यंत मोठा खुलासा
| Updated on: Aug 09, 2023 | 11:01 PM
Share

मुंबई : बाॅलिवूडमधील नेहमीच लव्ह स्टोरी आणि ब्रेकअपच्या चर्चा ऐकायला मिळतात. यापैकी अशीच एक लव्ह स्टोरी (Love story) खूप काळ गाजली ती म्हणजे करीना कपूर आणि शाहिद कपूर यांची लव्ह स्टोरी. करीना कपूर (Kareena Kapoor) आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) हे एकमेकांना तब्बल पाच वर्षे डेट करत होते. चाहते देखील यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत होते. मात्र, यांचे लग्न होऊ शकले नाही. सर्वकाही व्यवस्थित सुरू असताना अचानक यांचे ब्रेकअप झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला.

विशेष म्हणजे करीना कपूर हिने शाहिद कपूर याच्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये मोठे बदल केले होते. धक्कादायक गोष्ट म्हणजे करीना कपूर आणि शाहिद कपूर यांचे ब्रेकअप हे जब वी मेट चित्रपटाच्या शूटिंग वेळीच झाले. पाच वर्षे एकमेकांना डेट करत असताना चित्रपटाच्या शूटिंग वेळीच यांचे ब्रेकअप झाले.

विशेष म्हणजे ब्रेकअप झाल्यानंतरही करीना कपूर आणि शाहिद कपूर यांनी चित्रपटामध्ये धमाकेदार भूमिका केली. करीना कपूर हिचे शाहिद कपूर याला डेट करणे तिच्या आईला अजिबातच आवडले नव्हते. करीना कपूर हिची आई बबीता हिला शाहिद कपूर हा अजिबातच आवडत नव्हता.

इतकेच नाही तर करीना कपूर हिने शाहिद कपूर याच्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये अनेक बदल केले होते. जे तिच्या आईला मुळीच आवडले नव्हते. शाहिद कपूर याची देवावर खूप जास्त श्रध्दा आहे. उपवास आणि पूजा शाहिद कपूर हा नेहमीच करतो. इतकेच नाही तर शाहिद कपूर हा वेजेटेरियन आहे.

प्रेमामध्ये शाहिद कपूर याच्यासाठी करीना कपूर हिने नॉनव्हेज खाणे देखील बंद केले होते. जे करीना कपूर हिच्या आईला आवडले नव्हते. याचा खुलासा करीना कपूर हिनेच केला. करीना कपूर हिच्या आईला आईला शाहिद कपूर न आवडण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्यावेळी शाहिद कपूर हा खूप जास्त प्रसिद्ध अभिनेता नव्हता.

दुसरीकडे करीना कपूर ही बाॅलिवूडच्या टाॅप अभिनेत्रींमध्ये होती. यामुळेच करीना कपूर हिच्या आईला शाहिद कपूर हा आवडत नव्हता. करीना कपूर आणि शाहिद कपूर यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड चर्चेत होती. शाहिद कपूर याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर करीना कपूर हिने सैफ अली खान याला डेट करण्यास सुरूवात केली.

Follow Us
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case :प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान